तेहरान (Israel Lebanon Airstrike Escalation) : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होत असल्याचे चित्र दिसत असतानाच इस्रायलने लेबनानमध्ये जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दक्षिण लेबनानमध्ये झालेल्या या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर इराणने इस्रायलवर युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. (Israel Lebanon Airstrike Escalation)
तेहरान आणि अमेरिकेत झालेल्या करारानंतर इस्रायलने लेबनानमध्ये ८४ वेळा अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, दक्षिण लेबनानमधून इस्रायली सैन्याची माघार ही कोणत्याही शांतता कराराची अत्यंत महत्त्वाची अट आहे. इस्रायलने बळजबरीने घेतलेल्या भागांतून सैन्य मागे घेतल्याशिवाय या भागात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. (Israel Lebanon Airstrike Escalation)
या सर्व प्रकारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. जी-७ शिखर संमेलनात ट्रम्प यांनी सांगितले की, “इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानमधील प्रकरणावर जबाबदारीने वागण्याची गरज आहे.” संशयित व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण इमारतीवर हल्ला करणे चुकीचे असल्याचेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. (Israel Lebanon Airstrike Escalation)
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, लेबनानमधील संघर्ष खूप काळापासून सुरू असून त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. अशा लष्करी कारवायांमुळे प्रदेशात शांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो. दरम्यान, चार जणांच्या मृत्यूनंतर लेबनान आणि इस्रायल यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Israel Lebanon Airstrike Escalation)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.