ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम! भारतीय लष्कराची नवी ‘आर्मी युनिफॉर्म २०२६’ नियमावली लागू

Total Views |
 
Army Uniform 2026
 
मुंबई: (Army Uniform 2026) भारतीय लष्कराने ब्रिटिशकालीन परंपरांपासून दूर जात भारतीय संस्कृती, आधुनिकता आणि व्यावहारिकतेला प्राधान्य देणारी ‘आर्मी युनिफॉर्म २०२६’ ही नवी १७४ पानी नियमावली जाहीर केली आहे. या बदलांमुळे लष्कराच्या गणवेशात मोठे परिवर्तन होणार असून भारतीय अस्मिता आणि स्वदेशी ओळख अधिक ठळकपणे दिसून येणार आहे. (Army Uniform 2026)
 
नवीन नियमांनुसार अधिकृत आणि औपचारिक कार्यक्रमांमध्ये पाश्चात्य सूट-टायऐवजी भारतीय परंपरेचे प्रतीक मानले जाणारे ‘बंदी जॅकेट’ परिधान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच समारंभात वापरले जाणारे चमकदार पाऊच बेल्ट हटवण्यात आले असून संचलनादरम्यान अधिकाऱ्यांसाठी तलवार बाळगणे ऐच्छिक करण्यात आले आहे. (Army Uniform 2026)
 
हिवाळी गणवेशातही मोठे बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धापासून वापरात असलेले लोकरीचे व्ही-नेक स्वेटर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून त्याऐवजी आधुनिक बॅटल जॅकेट, अंगोला शर्ट आणि बेरेट कॅपचा समावेश करण्यात आला आहे. हा बदल जून २०२९ पर्यंत पूर्णपणे लागू होणार आहे. (Army Uniform 2026)
 
महिला अधिकाऱ्यांसाठी नवे नियम
 
महिला अधिकाऱ्यांना पांढरी साडी, पांढऱ्या दुपट्ट्यासह कुर्ता-सलवार किंवा घोट्यापर्यंतची सरळ पॅन्ट घालण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, स्लीव्हलेस कुर्ते, पलाझो आणि इतर अनौपचारिक पोशाखांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच रंगीत नेलपॉलिश, लिपस्टिक, टिकली आणि नथ घालण्यासही मनाई करण्यात आली आहे. (Army Uniform 2026)
 
टॅटू आणि मिशांबाबत कडक नियम
 
नव्या नियमांनुसार टॅटू आणि बॉडी पिअर्सिंगवर बंदी घालण्यात आली आहे. गणवेशात असताना ब्रेसलेट किंवा धार्मिक चिन्हे परिधान करता येणार नाहीत. मात्र शीख धर्मीयांच्या धार्मिक प्रतीकांना आणि पवित्र धाग्याला सूट देण्यात आली आहे. मिशांची कमाल लांबी १२ सेंटीमीटर निश्चित करण्यात आली आहे. तसेच गणवेशात असताना डिओडोरंट किंवा परफ्यूम वापरण्यास मनाई असून आफ्टर-शेव्ह लोशन वापरण्याची परवानगी असेल. (Army Uniform 2026)
 
'रॉयल' शब्दालाही निरोप
 
भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत शब्दसंग्रहातून ‘रॉयल’ सारखे अनेक ब्रिटिशकालीन शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कराचे स्वदेशीकरण, भारतीय मूल्यांचा स्वीकार आणि तिन्ही सशस्त्र दलांमध्ये गणवेशाची एकसमानता निर्माण करणे हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे. (Army Uniform 2026)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com