कोलकत्ता (TMC MPs Political Shift) : पश्चिम बंगालमधील निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी वरील राजकीय संकट जाण्याचे नावच घेत नाही आहे. टीएमसीच्या २० खासदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडत स्वतःचा वेगळा गट तयार केला अधिकांश राजकीय विशेषकांना वाटत होते इतर पक्षातील नेत्याप्रमाणे हे खासदारही. भाजपचा झेंडा हातात घेतील, परतू भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी खासदारांनी कायदेशीर प्रक्रियेपासून वाचण्यासाठी त्रिपुरा मधील स्थानिक नेशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया' (एनसीपीआय) मध्ये विलय केला. (TMC MPs Political Shift)
नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) हा त्रिपुरामधील नोंदणीकृत परंतु अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे. पक्षाची राजकीय मान्यता नसणे हिच बंडखोर खासदारांसाठी महत्वाची बाब होती. एनसीपीआय खासदारांना कायदेशीर पेचातुन सोडवण्याकरीत मार्ग मोकळा केला भाजपमध्ये प्रवेश न करता भाजपचा बाहेरून पाठिंबा देखील मिळाला.(TMC MPs Political Shift)
Delhi: On merging with NCPI, TMC Rebel MP Arup Chakraborty says, "There is only one reason behind this...We both parties want to come together in a standard position so that we can move forward..." pic.twitter.com/RgQFJexa7r
अमान्यताप्राप्त पक्षात प्रवेश करणे ही एक राजकीय शक्कल
तृणमूल काँग्रेस गटाचा एनसीपीआयमध्ये विलय करण्याचा निर्णय अनपेक्षित वाटत असला, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय बंडखोर खासदारांची सदस्यता सुरक्षित ठेवण्यासाठी कायदेशीर रणनीती आहे. या विलयामुळे संबंधित खासदारांना संसदेत आपली सामूहिक ताकद कायम राखण्यासाठी कायदेशीर संरक्षण मिळू शकते. तसेच, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक पातळीवर राजकीय विरोधाचा सामना न करता भाजपलाही संसदेत या खासदारांचा पाठिंबा मिळवणे अधिक सोयीचे ठरू शकते. (TMC MPs Political Shift)
खासदारांनी एनसीपीआयचीच साथ का निवडली ?
बंडखोर खासदारांची मूळ रणनीती स्पष्ट होती. दोन-तृतीयांश खासदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर तृणमूल काँग्रेसच्या संसदीय गटापासून वेगळे होत संसदेत स्वतंत्र गट स्थापन करणे आणि भाजप एनडीऐला पाठिंबा देणे, आशी खासदाराची राजकीय रणनीती होती. मात्र, संसदेतील कठोर नियम आणि पक्षांतरबंदी कायद्यामुळे अशा प्रकारच्या व्यवस्थेला कायदेशीर मान्यता मिळण्याची शक्यता कमी फार होती. या कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन बंडखोर खासदारांनी आपली रणनीती बदलली आणि एनसीपीआय या प्रदेशीक पक्षाचा पर्याय निवडला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या माध्यमातून त्यांना स्वतंत्र गट म्हणून कधीही मिळू न शकणारी कायदेशीर मान्यता आणि संरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (TMC MPs Political Shift)
बंडखोर खासदारांचे म्हणणे काय?
एका वरिष्ठ बंडखोर खासदाराने स्पष्ट केले की, हा निर्णय कोणत्याही विचारसरणीपेक्षा व्यावहारिक राजकीय गरजांवर आधारित होता. "आम्हाला सामूहिकपणे पुढे जायचे होते आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय ममता बॅनर्जी यांच्या नियंत्रणाबाहेर स्वतंत्र राजकीय प्रभुत्व निर्माण करायचे होते. अशा परिस्थितीत हा आमच्यासाठी योग्य पर्याय ठरला," असे त्यांनी सांगितले. (TMC MPs Political Shift)
दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी या घडामोडींकडे वेगळ्या नजरेने पाहिले आहे. त्यांच्या मते, हा कोणताही वैचारिक किंवा राजकीय विलय नसून, केवळ कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी आखलेली रणनीती आहे. (TMC MPs Political Shift)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.