मुंबई: (IAF AN-32 Crash) भारतीय हवाई दलाचे एएन-32 मालवाहू विमान शनिवारी १३ जून रोजी आसाममधील जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर अपघातग्रस्त झाले. या भीषण दुर्घटनेत हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. (IAF AN-32 Crash)
भारतीय हवाई दलाने अधिकृत निवेदनाद्वारे या अपघाताची माहिती दिली. अपघातात स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर-वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर-वायू दानिश आलम यांचा मृत्यू झाला आहे. (IAF AN-32 Crash)
हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर जयदीप यांनी जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर एएन-32 विमान अपघातग्रस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमान हवाई तळावर उतरत असताना नियंत्रण सुटून कोसळले आणि त्यानंतर त्याला आग लागली. (IAF AN-32 Crash)
भारतीय हवाई दलाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आसाममधील जोरहाट येथे एएन-32 विमानाला झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. त्यांनी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे." अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी अर्थात चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. अपघातस्थळी मदतकार्य आणि प्राथमिक तपास सुरू असल्याचे हवाई दलाने सांगितले आहे. (IAF AN-32 Crash)
The Indian Air Force deeply regrets the loss of five personnel in the An-32 accident at Jorhat, Assam.
Sqn Ldr Prashant Singh, Flt Lt Shubham Kumar, Sgt Jitendra Sharma, Agniveervayu Khemaram Kumawat and Agniveervayu Danish Alam made the supreme sacrifice in the line of duty.… pic.twitter.com/9SmOjtS5mU
हवाई दलाने नागरिक आणि माध्यमांना कोणतेही तर्कवितर्क न लावण्याचे आवाहन केले आहे. प्राथमिक तपासाचे निष्कर्ष समोर येईपर्यंत अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत भारतीय हवाई दलाने दुःखाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. (IAF AN-32 Crash)
काय आहे AN-32 विमान?
एएन-32 हे दोन इंजिन असलेले टर्बोप्रॉप लष्करी वाहतूक विमान आहे. हे विमान मूळतः सोव्हिएत युनियनच्या अँटोनोव्ह डिझाईन ब्युरोने विकसित केले होते. भारतीय हवाई दलाच्या वाहतूक ताफ्यातील हे एक महत्त्वाचे विमान असून सैनिकांची वाहतूक, आपत्कालीन मदतकार्य, रसद पुरवठा आणि पॅराट्रूपर्स उतरवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. (IAF AN-32 Crash)
NEW: Indian Air Force An-32 military transport aircraft crashed on Saturday while attempting to land at an air force base in the northeastern city of Jorhat.
"We are aware of the IAF transport aircraft accident in Jorhat. We are awaiting further details," Assam Chief Minister… pic.twitter.com/WANCTi2dkS
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) June 13, 2026
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.