रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! ठाणे-कल्याण मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक, अनेक लोकल गाड्या रद्द, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करा

Total Views |
 
Central Railway Mega Block
 
मुंबई: (Central Railway Mega Block) रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १३ जून आणि १४ जूनच्या मध्यरात्री मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा परिणाम ठाणे-कल्याणदरम्यानच्या उपनगरी रेल्वे सेवांवर होणार आहे. दिवा स्थानकात नवीन पादचारी पूल (FOB) उभारणीसाठी गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी हा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. (Central Railway Mega Block)
 
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री १.२० वाजल्यापासून १४ जून रोजी पहाटे ५.४० वाजेपर्यंत हा ब्लॉक लागू असेल. या कालावधीत कळवा ते डोंबिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद तसेच धीम्या मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर निर्बंध राहतील. (Central Railway Mega Block)
 
ब्लॉकदरम्यान ठाणे आणि कल्याण स्थानकांमधील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काही अप धीम्या लोकल गाड्या कल्याण आणि ठाणेदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जाणार असून त्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे या गाड्यांना १० ते १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. (Central Railway Mega Block)
 
याशिवाय शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे सुटणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचा प्रवास कुर्ला, परळ आणि ठाणे स्थानकांवरच समाप्त करण्यात येणार असून काही गाड्या कुर्ला, ठाणे किंवा कल्याण स्थानकांवरूनच सुरू करण्यात येतील. (Central Railway Mega Block)
 
या ब्लॉकचा परिणाम मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या कल्याण आणि ठाणे दरम्यान सहाव्या मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने पोहोचू शकतात. (Central Railway Mega Block)
 
प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हे काम आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले असून, होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. (Central Railway Mega Block)
 
 
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com