भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण! स्वदेशी बनावटीच्या पहिल्या C-295 विमानाचे यशस्वी चाचणी उड्डाण

Total Views |
 
C295 Aircraft
 
मुंबई: (C295 Aircraft) भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्राने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गुजरातमधील वडोदरा येथे तयार करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या C-295 लष्करी वाहतूक विमानाने आपले पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या यशामुळे भारतात लष्करी विमान निर्मितीच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. (C295 Aircraft)
 
हे विमान एअरबस आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आले आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांना बळकटी देणारा महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. (C295 Aircraft)
 
२०२१ च्या करारानंतर मोठे यश...
 
भारताने सप्टेंबर २०२१ मध्ये स्पेनसोबत ५६ C-295 विमानांच्या खरेदीसाठी २१,९३५ कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानुसार १६ विमाने थेट स्पेनमधून पुरवली जात आहेत, तर उर्वरित ४० विमानांची निर्मिती भारतात केली जाणार आहे. वडोदरा येथील अत्याधुनिक अंतिम असेंब्ली लाईनचे उद्घाटन २८ ऑक्टोबर २०२४ रोजी नरेंद्र मोदी आणि पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते करण्यात आले होते. (C295 Aircraft)
 
C-295 भारतीय हवाई दलाला यंदाच सुपूर्द होणार
 
एअरबस डिफेन्सच्या माहितीनुसार, पहिले चाचणी उड्डाण हे विमानाच्या उत्पादनोत्तर पडताळणी प्रक्रियेतील महत्त्वाचे पाऊल आहे. भारतात तयार होणाऱ्या ४० विमानांपैकी हे पहिले विमान असून ते याच वर्षात भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने या यशाचे स्वागत करत संपूर्ण प्रकल्पाशी संबंधित संघाचे अभिनंदन केले आहे. हवाई दलाच्या मते, हे यश भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतांचे आणि स्वदेशी उत्पादन सामर्थ्याचे प्रतीक आहे. (C295 Aircraft)
 
C-295 हे मध्यम पल्ल्याचे सामरिक लष्करी वाहतूक विमान असून ते भारतीय हवाई दलाच्या जुन्या ॲवरो-748 विमानांची जागा घेणार आहे. सैन्य वाहतूक, रसद पुरवठा, वैद्यकीय स्थलांतर आणि विशेष लष्करी मोहिमांसाठी या विमानाचा वापर केला जाणार आहे. (C295 Aircraft)
 
या विमानात एकावेळी ७० सैनिक, ४८ पॅराट्रूपर्स किंवा २४ वैद्यकीय स्ट्रेचर्स वाहून नेण्याची क्षमता आहे. दोन शक्तिशाली PW127G टर्बोप्रॉप इंजिनांनी सज्ज असलेले हे विमान कमी अंतराच्या आणि खडबडीत धावपट्ट्यांवरूनही सहज उड्डाण व अवतरण करू शकते. (C295 Aircraft)
 
डोंगराळ प्रदेश, सीमावर्ती क्षेत्रे आणि दुर्गम लष्करी तळांवर कार्य करण्यासाठी C-295 अत्यंत उपयुक्त मानले जाते. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशनल क्षमतेत मोठी वाढ होणार असून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. (C295 Aircraft)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com