अहमदाबाद: (Ahmedabad Plane Crash) अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमानाच्या भीषण अपघाताला १२ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. १२ जून २०१५ रोजी घडलेल्या या अपघातात तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर अवघ्या ३२ सेकंदांत विमान कोसळून प्रचंड स्फोट झाला आणि संपूर्ण विमानाला आग लागली. या भीषण दुर्घटनेतून केवळ एकच प्रवासी चमत्कारिकरीत्या जिवंत बचावला होता तो म्हणजे विश्वास कुमार रमेश. (Ahmedabad Plane Crash)
'11A' सीट ठरली जीवनदायिनी...
विश्वास कुमार रमेश हे विमानातील '11A' क्रमांकाच्या सीटवर बसले होते. ही जागा आपत्कालीन बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ असल्याने विमानाचा पुढील भाग तुटल्यानंतर त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली. सीट बेल्ट काढून काही क्षणांतच त्यांनी बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. विमानतज्ज्ञांच्या मते, '11A' सीट ही विंग बॉक्सजवळ असल्याने तुलनेने सुरक्षित भाग मानला जातो. (Ahmedabad Plane Crash)
दुर्घटनेनंतर वर्षभर उलटूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याची खंत रमेश यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "या अपघाताने माझे आयुष्य बदलून टाकले. माझा भाऊ गेला, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. नेमकं काय आणि का घडलं, याची उत्तरं प्रत्येक पीडित कुटुंबाला मिळाली पाहिजेत." (Ahmedabad Plane Crash)
या दुर्घटनेत रमेश यांनी आपल्या सख्ख्या भावाला गमावले. आगीच्या लोटांतून बाहेर पडतानाचे त्यांचे फोटो जगभर चर्चेत आले होते. मात्र, शारीरिक जखमांपेक्षा मानसिक वेदना अधिक खोल असल्याचे ते सांगतात. लंडनमध्ये वास्तव्यास असलेले रमेश अपघातानंतर अनेक महिने विमानप्रवास करू शकले नाहीत. अखेर अडीच महिन्यांनंतर ते पुन्हा लंडनला परतले. (Ahmedabad Plane Crash)
या अपघाताला एक वर्ष पूर्ण होत असतानाही रमेश नैराश्य, भीती आणि अपराधीपणाच्या भावनेशी संघर्ष करत आहेत. "मी अजूनही त्या दिवसातून बाहेर आलो नाही," असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. अपघातानंतर त्यांच्या खांद्याला, पाठीला, गुडघ्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापती झाल्या होत्या. शारीरिक वेदना आणि मानसिक आघातामुळे ते अद्याप नियमित कामावर परत जाऊ शकलेले नाहीत. AI-171 दुर्घटना ही भारताच्या नागरी विमान वाहतूक इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटनांपैकी एक मानली जाते. एक वर्ष उलटूनही या दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Ahmedabad Plane Crash)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.