२३व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार? शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता, जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स

Total Views |
 
PM Kisan 23rd Installment
 
नवी दिल्ली: (PM Kisan 23rd Installment) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे २२ हप्ते वितरित करण्यात आले असून आता शेतकऱ्यांचे लक्ष २३व्या हप्त्याकडे लागले आहे. (PM Kisan 23rd Installment)
 
२२वा हप्ता कधी जमा झाला होता?
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्च २०२६ रोजी आसाममधील गुवाहाटी येथून पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर जवळपास तीन महिने उलटल्याने पुढील हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. (PM Kisan 23rd Installment)
 
२३वा हप्ता कधी येणार?
 
सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी मागील हप्त्यांच्या वेळापत्रकानुसार जून-जुलै २०२६ दरम्यान २३वा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (PM Kisan 23rd Installment)
 
काही माध्यमांतील वृत्तांनुसार १८ जूननंतर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा पुढील हप्ता जमा होऊ शकतो. (PM Kisan 23rd Installment)
 
हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी अनिवार्य
 
e-KYC पूर्ण करा
 
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. e-KYC न केलेल्या लाभार्थ्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात. (PM Kisan 23rd Installment)
 
बँक खाते आधारशी लिंक असावे
 
शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच खाते सक्रिय असावे आणि IFSC कोड योग्य असावा. (PM Kisan 23rd Installment)
 
लाभार्थी स्थिती तपासा
 
लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Beneficiary Status तपासावी. यामुळे अर्जाची स्थिती आणि हप्ता मिळण्याबाबत माहिती मिळू शकते. (PM Kisan 23rd Installment)
 
चुकीची माहिती टाळा...
 
डुप्लिकेट नोंदणी, चुकीचा आधार क्रमांक किंवा बँक तपशीलातील त्रुटींमुळे हप्ता अडकू शकतो. (PM Kisan 23rd Installment)
पुढील हप्ता वेळेत मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने e-KYC पूर्ण करावी, बँक खात्याची माहिती पडताळून पाहावी आणि लाभार्थी यादीतील आपले नाव तपासावे. सरकारकडून २३व्या हप्त्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निधी थेट खात्यात जमा केला जाईल. (PM Kisan 23rd Installment)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com