खाद्यतेल विक्रीसाठी नवे नियम; आता ठराविक पॅक आकारातच मिळणार तेल, ग्राहकांना काय फायदा?

Total Views |
 
Government Cooking Oil Decision
 
मुंबई: (Government Cooking Oil Decision) खाद्यतेलाच्या किमतींबाबत ग्राहकांना अधिक पारदर्शकता मिळावी आणि विविध ब्रँड्सच्या दरांची सहज तुलना करता यावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने खाद्यतेल उत्पादक आणि आयातदारांना त्यांची उत्पादने केवळ निश्चित पॅक आकारांमध्येच विकण्याचे निर्देश दिले आहेत. (Government Cooking Oil Decision)
 
सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या विविध आणि अमापक आकारांच्या पॅकेजिंगवर मर्यादा येणार असून ग्राहकांना योग्य किंमतीत उत्पादने निवडणे अधिक सोपे होणार आहे. (Government Cooking Oil Decision)
 
कोणते बदल होणार?
 
सध्या खाद्यतेल विविध आकारांच्या पॅकमध्ये उपलब्ध असते. मात्र नवीन नियमानुसार खाद्यतेलाचे पॅकेजिंग २०० मिलीलीटरपासून २० लिटरपर्यंतच्या केवळ नऊ प्रमाणित आकारांमध्येच करता येणार आहे. (Government Cooking Oil Decision)
 
हा नियम देशांतर्गत उत्पादन तसेच आयात करण्यात येणाऱ्या सर्व खाद्यतेलांना लागू असेल. (Government Cooking Oil Decision)
 
कोणत्या तेलांचा समावेश?
 
नवीन नियमांमध्ये खालील प्रमुख खाद्यतेलांचा समावेश करण्यात आला आहे:
 
पाम तेल
सोयाबीन तेल
सूर्यफूल तेल
मोहरी तेल
भुईमूग तेल
इतर खाद्यतेलांचे प्रकार
 
कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत
 
नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत उत्पादक आणि आयातदारांना आपले पॅकेजिंग वजननुसार बदलावे लागणार आहे. (Government Cooking Oil Decision)
 
वजनाची माहिती देणे बंधनकारक
 
सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. ज्या पॅकेजवर तेलाचे प्रमाण मिलीलीटर किंवा लिटरमध्ये नमूद केलेले असेल, त्यावर त्या प्रमाणाचे समतुल्य वजन देखील नमूद करावे लागणार आहे. यामुळे ग्राहकांना विविध ब्रँड्सच्या किंमती आणि प्रमाणाची अधिक अचूक तुलना करता येईल. (Government Cooking Oil Decision)
 
लहान पॅकना सूट
 
ग्रामीण आणि कमी उत्पन्न गटातील ग्राहकांचा विचार करून सरकारने २०० मिलीलीटरपेक्षा कमी क्षमतेच्या पॅकना या नियमांतून सूट दिली आहे. त्यामुळे छोट्या पॅकमधील खाद्यतेल पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहणार आहे. (Government Cooking Oil Decision)
दरम्यान, ग्राहक व्यवहार विभागाने सांगितले की, भारतातील खाद्यतेल उद्योगातील जवळपास ९० टक्के व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध उद्योग संघटनांशी चर्चा आणि सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Government Cooking Oil Decision)
 
ग्राहकांना काय फायदा?
 
नवीन नियमांमुळे ग्राहकांना विविध ब्रँड्सच्या किमतींची थेट तुलना करणे सोपे होईल. तसेच पॅकेजिंगमधील गोंधळ कमी होऊन खरेदी करताना अधिक पारदर्शकता मिळेल. सरकारच्या मते, हा निर्णय ग्राहक संरक्षण आणि योग्य किंमत माहिती उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. (Government Cooking Oil Decision)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com