हलालचा वाढता प्रभाव : संकल्पना, वास्तव आणि वाद

    01-Jun-2026   
Total Views |

नुकतीच गोकुळ दूध व्यवस्थापनाने हलाल प्रमाणपत्र घेतल्याचे वृत्त आपण वाचले. त्यावर उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे. गोकुळ वर बहिष्कार टाका इथपासून ते हलाल प्रमाणपत्र घेतले तर काय बिघडले अशा हिंदूंच्या प्रतिक्रिया आहेत!! मध्यंतरी उत्तरप्रदेश मध्ये हलाल उत्पादनांवर बंदी, हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांवर कारवाई ची बातमी सर्वांनी वाचली असेलच!! कदाचित विस्मरणातही गेली असेल!!. बऱ्याच जणांना हलाल शब्द कदाचित नवीनच असेल, काही जणांना हलाल मांस पदार्थ म्हणून माहिती असेल आणि काही जणांना थोडीफार माहिती असेल. या निमित्त हलाल या विषयावर देशभरात एक चर्चा सुरू झाली आहे. जगभरात कदाचित उत्तरप्रदेश या एका राज्यात का होईना हलाल या विषयावर कायदेशीर कारवाई सुरू झालेला भारत हा एकमेव देश असू शकेल!! त्यानिमित्त हलाल या विषयाची माहिती सर्वांना व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच!! हा एका लेखात मांडण्याचा विषय नाही. त्यामुळे काही लेखांची मालिका या निमित्त सादर करण्याचा एक प्रयत्न....

बऱ्याच वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा नमक हराम हा सिनेमा आला होता.... त्यातील हराम शब्द बहुधा सर्वांना वेगवेगळ्या वाक्प्रचार आणि बऱ्याचदा वापर यामुळे माहिती असेलच!!.... हराम, हरामी असे शब्द बहुधा नेहमी सहजपणे वापरात येतात. भारतावर बऱ्याच कालावधीसाठी मुस्लिम शासन असल्याने आपल्या भाषेतही बऱ्याच उर्दू शब्दांची सरमिसळ झाली आहे, इतकी की ते शब्द मराठीच आहेत असे वाटते.... हरामी हा तसाच एक शब्द!! उर्दूतून आलेला!!

वातस्तवात उर्दुमध्ये एक शब्दांची जोडी आहे.... म्हंटल तर विरुद्ध अर्थांची!!.... हलाल आणि हराम!! हलाल म्हणजे जे शरियत नुसार मान्य आहे ते आणि हराम म्हणजे जे शरियत नुसार मान्य नाही ते/ जे निषिद्ध मानले गेले आहे असे!!

मंडळी, सध्या बऱ्याच ठिकाणी हलाल हा शब्द कदाचित ऐकला असेल. मूलतः हलाल ही संकल्पना मांसाहारी खाण्यासंदर्भात मांडली गेली आहे असा आपल्या सर्वांचा समज. हलाल मटण ही संकल्पना ही बऱ्याच जणांना माहिती असेल. विशेषतः मुस्लिम मंडळी ही हलाल पद्धतीने प्राण्याला मारून मिळवलेले मांस भक्षण करतात, ज्यू मंडळीसुद्धा हलाल संकल्पना मानतात!!.... हिंदूंमध्ये झटका पद्धती वापरली जाते!!..... हलाल ही संकल्पना एव्हढ्यावरच मर्यादित होती आणि आहे असा आपल्या सर्वांचा समज होता आणि बऱ्याच जणांचा अजूनही आहे!!....

पण मंडळी, काही दिवसांपूर्वी शाकाहारी पदार्थसुद्धा हलाल प्रमाणित असलेले पाहिले!!.... आपल्या नेहमीच्या वापरातील टूथपेस्ट, तुलसी आयुर्वेदिक चहा, चॉकलेट्स, साबण हे सुद्धा!! आपण हिमालयाची उत्पादने घेतो ती सुद्धा हलाल प्रमाणित. मॅक्डोनाल्डस, डोमिनोज सारखी मंडळी तर आमची सर्व रेस्टॉरंट्स ही हलाल प्रमाणित असल्याचे जाहीरपणे सांगतात!! मध्यंतरी शबरीमाला मंदिरात प्रसाद बनविण्यासाठी वापरात येणारा गुळही हलाल प्रमाणित वापरतात असे समजले.... मंदिरात आपण वापरतो तो धुपही हलाल प्रमाणित असा फोटो पाहिल्याचे आठवते.... एव्हढेच नाही तर आता सर्वच खाण्याचे पदार्थ.... अगदी तांदूळ, गहू, मीठ, मसाला, गूळ, तेल, मध आणि सर्व काही.... हलाल प्रमाणित असतात म्हणे!!.... आश्चर्य तर पूढे आहे.... याची माहिती घेता घेता असे समजले की हलाल संकल्पना बरीच पुढे गेलेली आहे.... उत्पादन सुविधा (फॅक्टरी) सुद्धा हलाल प्रमाणित, स्टोरेज सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच सेवा पुरविणारी अस्थापनेही हलाल प्रमाणित.... हलाल प्रमाणित औषधे, सौंदर्य प्रसाधने, बँकिंग, फॅशन, स्टॉक एक्सचेंज, गृह संकुल, हॉस्पिटल, हॉटेल्स, टुरिझम, एसी, वॉशिंग मशीन.... एव्हढेच काय तर डेटिंग साईट सुद्धा!!

आखाती देशात काहीही माल निर्यात करायचा असेल तर हलाल प्रमाणीतच असायला हवा!!...... बापरे..... आणि आपण समजत होतो की हलाल मांस एव्हढया पुरतेच हे मर्यादित आहे..... अहो मंडळी युरोपातील काही देशांच्या अर्थव्यस्था या हलाल मुळे धोक्यात आल्या आहेत असेही समजते... युके, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथे तर याविरुद्ध मोठी चळवळ उभी रहात आहे असे समजते!! एक समांतर अर्थव्यवस्था उभी रहात आहे.... ज्याची व्याप्ती २०१७ मध्ये सुमारे २.१ ट्रीलियन अमेरिकी डॉलर्स होती आणि २०२३ पर्यंत ती ३ ट्रीलियन अमेरिकी डॉलर्स होण्याचे अनुमान होते. २०२५ साली ती ७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स होती!!.... मंडळी २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ३.९२ ट्रीलियन अमेरिकी डॉलर्स एव्हढी होती.... यावरून या हलाल अर्थव्यवस्थेचा वेग आणि व्याप्ती लक्षात येईल!!

डोक्याला झिणझिण्या आल्या ना????....... काय प्रकार आहे हा की ज्यापासून आपण अजूनही अनभिज्ञ आहोत आणि जगभर ज्याने हाहाःकार उडवून दिलाय.... आणि हो.... ज्याचा भारतातही बराच परिणाम होतोय.... पण आपण अजूनही झोपलोय!! छद्मी सेक्युलारीझमच्या वाळूत आपली चोच घालून बसलो आहोत!!!! भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तसे आपण सर्व जण "मला काय त्याचे???" या रोगाने व्याप्त झालेलो आहोत!!!!

नक्की काय आहे हे प्रकरण???? यासंबंधी थोडेसे वाचन केले आणि अक्षरशः परिणामांच्या भीतीने तोंडचे पाणीच पळाले म्हणा ना!!.... आपल्या पुढच्या पिढीच्या हातात आपण काय देणार आहोत या केवळ कल्पनेनेच अस्वस्थता आली.... आणि वाटलं की आपल्या सर्वांसमोर हा विषय थोडक्यात मांडावा.... या विषयाचा खर म्हणजे तज्ज्ञांनी.... विशेषतः समाजधुरीण, धार्मिक संघटना, धर्म गुरू, राष्ट्र प्रथम असे मानणारे राजकीय पक्ष आणि नेते मंडळी आणि अर्थतज्ञ यांनी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.... काही छोटेखानी लेख यानिमित्त लिहून आपल्या सर्वांना हा विषय नक्की काय आहे याचा थोडक्यात परिचय करून द्यायचा प्रयत्न करणार आहे..... या विषयावर कोणतेही मत व्यक्त न करता तथ्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.... अपेक्षा आहे की आपण स्वतः या विषयाची अधिक माहिती मिळवून यावर समाज आणि देश म्हणून काय करता येईल याचा विचार आणि कृती करावी.... भेटुयात पुढील काही लेखात हलाल विषय घेऊन...

- अरविंद श्रीधर जोशी 

(टीप - धार्मिकतेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम या संदर्भात झालेले संशोधन आणि अभ्यास सर्वांसमोर मांडला जावा आणि त्या द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम समजावा आणि ती सुदृढ व्हावी हा या लेखांचा उद्देश आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणे किंवा कोणामध्ये तेढ निर्माण करणे हा यामागील उद्देश नाही.)






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक