Suvendu Adhikari CM: बंगालमध्ये ‘कमळ’ फुललं! सुवेंदू अधिकारींच्या मुख्यमंत्रीपदावरून संजय राऊतांचा घणाघात, नेमकं काय म्हणाले?

Total Views |
 
Suvendu Adhikari CM
 
कोलकाता : (Suvendu Adhikari CM) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. भाजपने अभूतपूर्व यश मिळवत प्रथमच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. तर ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज शनिवार दि. ९ मे रोजी कोलकाता येथे भव्य शपथविधी सोहळा पार पडत असून सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. (Suvendu Adhikari CM)
 
दरम्यान, या सत्तांतरावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना सत्तेवर बसवण्याची परंपरा भाजपने कायम ठेवली आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. (Suvendu Adhikari CM)
 
राऊत यांनी २०२० मधील एका कथित स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख करत, त्यात काही नेत्यांना पैसे घेताना दाखवण्यात आले होते आणि त्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांचेही नाव समोर आले होते, असा दावा केला. तसेच, ईडी आणि अँटी करप्शनच्या कारवाईनंतर अधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आणि आता मुख्यमंत्री होत आहेत, असेही त्यांनी म्हटले. (Suvendu Adhikari CM)
 
राऊत यांनी भाजपवर निशाणा साधताना “भाजपचे वॉशिंग मशीन अजूनही सुरू आहे. तो डाग अजूनही साफ झालेला नाही,” असा टोला लगावला. “अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपद देणे ही भाजपची ‘कन्सिस्टन्सी’ आहे,” असेही म्हटले आहे. (Suvendu Adhikari CM)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com