मुंबई : (Tamil Nadu Political Crisis) तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा तिढा कायम असून सुपरस्टार आणि टीव्हीके (TVK) पक्षप्रमुख विजय थलपती यांना अद्याप बहुमताचा आवश्यक आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ सिद्ध करण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे. “आधी बहुमताचा आकडा दाखवा आणि त्यानंतरच सरकार स्थापनेसाठी या,” असा स्पष्ट संदेश राज्यपालांकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Tamil Nadu Political Crisis)
सध्या विजय यांच्या पक्षाकडे बहुमतासाठी आवश्यक जागांपेक्षा कमी आमदार असल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला विलंब होत आहे. काही वृत्तांनुसार पक्षाला अजून १० आमदारांची गरज आहे, तर काही ठिकाणी ११८ च्या बहुमतासाठी पक्ष ११६ जागांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. या राजकीय अनिश्चिततेमुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.(Tamil Nadu Political Crisis)
दरम्यान, शनिवारी विजय थलपती यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार असल्याची चर्चा होती. मात्र तो रद्द झाल्यानंतर समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली. याच पार्श्वभूमीवर विजय यांच्या एका समर्थकाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली.(Tamil Nadu Political Crisis)
इसक्कियप्पन असे या ४० वर्षीय समर्थकाचे नाव असून तो गंभीर भाजला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. विजय मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तो गेल्या चार महिन्यांपासून प्रार्थना करत होता. विजय यांच्या शपथविधीला होत असलेल्या विलंबामुळे तो भावनिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती समोर आली आहे.(Tamil Nadu Political Crisis)
इतकेच नव्हे तर विजय मुख्यमंत्री व्हावेत म्हणून इसक्कियप्पनने धार्मिक विधी आणि नवसही केले होते. त्याने देवाला साकडं घालत १६ फूट भाला चेहऱ्यातून आरपार घालून नवस पूर्ण केल्याचीही चर्चा आहे. मात्र सरकार स्थापनेला होत असलेल्या विलंबामुळे त्याने अखेर टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.(Tamil Nadu Political Crisis)
या घटनेनंतर तामिळनाडूतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी विजय यांना आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्याची विनंती केली आहे. “जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान केला जात आहे. नवीन सरकार स्थिर असावे अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे,” असे त्यांनी म्हटले.(Tamil Nadu Political Crisis)
दरम्यान, राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काही अन्य हिंसक घटनाही समोर आल्या आहेत. व्हिसीके कार्यालयाबाहेर एका तरुणावर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे, तर वल्लियूरमध्ये आणखी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.(Tamil Nadu Political Crisis)
या सर्व घटनांमुळे तामिळनाडूमधील राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला असून विजय थलपती पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Tamil Nadu Political Crisis)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.