मुंबई : (Pakistan IMF Loan Crisis) आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा International Monetary Fund (IMF) चा आधार मिळाला आहे. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक ताण वाढलेल्या परिस्थितीत IMF ने पाकिस्तानला तब्बल १.२१ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. या कर्जासाठी पाकिस्तान सरकारला IMF च्या कठोर आर्थिक अटी मान्य कराव्या लागल्या आहेत.(Pakistan IMF Loan Crisis)
IMF ने हे कर्ज दोन स्वतंत्र वित्तपुरवठा योजनांअंतर्गत मंजूर केले असून, पुढील आठवड्यात ही रक्कम पाकिस्तानला वितरित होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने वित्तीय आणि मौद्रिक धोरणांमध्ये सुधारणा केल्याचा दावा करत IMF ने या मदतीला हिरवा कंदील दिला आहे.(Pakistan IMF Loan Crisis)
याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये IMF ने पाकिस्तानसाठी Extended Fund Facility (EFF) अंतर्गत ३७ महिन्यांच्या कालावधीत ७ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली होती. त्याचबरोबर Resilience and Sustainability Facility (RSF) अंतर्गत अतिरिक्त १.४ अब्ज डॉलर्स देण्याचेही मान्य करण्यात आले होते.(Pakistan IMF Loan Crisis)
आता IMF च्या कार्यकारी मंडळाने EFF अंतर्गत सुमारे १ अब्ज डॉलर्स आणि RSF अंतर्गत २१० दशलक्ष डॉलर्स देण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या टप्प्यात पाकिस्तानला मिळणाऱ्या कर्जाची एकूण रक्कम १.२० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.(Pakistan IMF Loan Crisis)
माध्यमांच्या अहवालानुसार, पाकिस्तानला आतापर्यंत IMF कडून एकूण ८.४ अब्ज डॉलर्सच्या दोन वेगवेगळ्या कर्ज पॅकेजअंतर्गत सुमारे ४.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ४० हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. ही नवीन रक्कम मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचा परकीय चलनसाठा १७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, भारताच्या ७०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक परकीय चलनसाठ्याच्या तुलनेत हा आकडा अत्यंत कमी मानला जातो.(Pakistan IMF Loan Crisis)
दरम्यान, IMF कडून कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान सरकारने जनतेवर आर्थिक बोजा वाढवल्याची टीका होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता वाढत असतानाही सरकारला IMF च्या कठोर आर्थिक अटींचे पालन करावे लागत आहे. कर वाढ, अनुदान कपात आणि खर्च नियंत्रणासारख्या निर्णयांमुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढल्याचे चित्र आहे.(Pakistan IMF Loan Crisis)
आर्थिक सुधारणा आणि वित्तीय शिस्तीचे पालन केल्यामुळे IMF ने पाकिस्तानच्या कामगिरीचे कौतुक केले असले, तरी आगामी काळात सरकारच्या आर्थिक धोरणांवर मोठे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Pakistan IMF Loan Crisis)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.