मुंबई: (Bodh Gaya tour) मुंबई शहर आणि उपनगरातील जेष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून मोठी संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत बिहारमधील पवित्र स्थळ बोधगया येथे दर्शनाची विशेष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ३ ते ९ जून या कालावधीत पार पडणार असून, या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. (Bodh Gaya tour)
मुंबई शहर जिल्ह्यासाठी: २० मे
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी: १५ मे
कोण पात्र आहेत?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. (Bodh Gaya tour)
अर्जदाराचे वय किमान ६० वर्षे असावे
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
आधार कार्ड अनिवार्य (किंवा अन्य वैध ओळखपत्र)
शिधापत्रिका धारक असणे आवश्यक
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹२.५ लाखांपर्यंत असावे
दरम्यान, या योजने अंतर्गत एका लाभार्थ्यासाठी सरकारकडून ₹३०,००० पर्यंत खर्च केला जातो. राज्यातील १६१ आणि राज्याबाहेरील ८८ अशा एकूण २४९ तीर्थस्थळांचा समावेश असलेली ही योजना सर्व धर्मियांसाठी खुली आहे. (Bodh Gaya tour)
बोधगयेचे महत्व काय?
महाबोधी मंदिर असलेले बोधगया हे जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच ठिकाणी गौतम बुद्ध यांना पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. बोधगया पवित्र स्थळ हे बिहार राज्यात असून गया शहरापासून १५ किमी अंतरावर आहे. २००२ साली महाबोधी मंदिराला 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थाने यादीमध्ये स्थान मिळाले आहे. ५५ मीटर उंचीचे विटांनी बनलेले भव्य असे महाबोधी मंदिर सम्राट अशोकांनी बांधले होते. (Bodh Gaya tour)