मुंबई : (China Helped Pakistan During Operation Sindoor) चीनने प्रथमच मान्य केले आहे की, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान त्यांनी पाकिस्तानला प्रत्यक्ष तांत्रिक मदत पुरवली होती. चिनी अभियंता झांग हेंग यांनी दिलेल्या माहितीनंतर हा मोठा खुलासा समोर आला आहे.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
२२ एप्रिल २०२५ रोजी Pahalgam येथे ‘लष्कर’शी संबंधित दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाशी संबंधित नऊ ठिकाणांवर लक्ष्य साधण्यात आले.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
चार दिवस सुरू असलेल्या या संघर्षात चीनने पाकिस्तानला प्रत्यक्ष “on-site” तांत्रिक सहाय्य दिल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानकडे असलेल्या चीन-निर्मित Chengdu J-10CE लढाऊ विमानांच्या उड्डाणासाठी प्रशिक्षण, तांत्रिक मदत, उपग्रह माहिती (satellite data) आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे चीनकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी चीन-निर्मित PL-15 Missile क्षेपणास्त्रांसह तुर्की-निर्मित ‘YIHA’ आणि ‘Songar’ ड्रोनचा वापर केला होता. मात्र भारतीय संरक्षण यंत्रणांनी हे सर्व हल्ले यशस्वीरित्या निष्प्रभ केले. भारतीय लष्कराचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंग यांनी यापूर्वीच दावा केला होता की चीन पाकिस्तानला भारतातील महत्त्वाच्या लष्करी प्रतिष्ठानांबाबत “live updates” देत होता. जुलै २०२५ मध्ये त्यांनी पाकिस्तान हा चिनी लष्करासाठी “जिवंत प्रयोगशाळा” असल्याचेही म्हटले होते.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
Aviation Industry Corporation of China (AVIC) अंतर्गत काम करणाऱ्या ‘चेंगडू एअरक्राफ्ट डिझाइन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’मधील अभियंता झांग हेंग यांनी चिनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत संघर्षादरम्यान पाकिस्तानला दिलेल्या मदतीबाबत माहिती दिली.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
“आम्ही सपोर्ट बेसवर असताना सतत लढाऊ विमानांचा आवाज आणि सायरन्स ऐकू येत होते. तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ पोहोचले होते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तो अत्यंत कठीण काळ होता,” असे झांग हेंग यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांचे पथक पाकिस्तानच्या उपकरणांनी “पूर्ण युद्धक्षमतेने” काम करावे यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी तांत्रिक सहाय्य देत होते. त्यामुळे भारताविरोधातील पाकिस्तानच्या मोहिमेत चीनचा थेट सहभाग असल्याचे हे पहिले सार्वजनिक आणि अधिकृत संकेत मानले जात आहेत.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
दरम्यान, त्याच संस्थेतील आणखी एक कर्मचारी Xu Da यांनी ‘J-10CE’ विमानाची तुलना “मुलाशी” करत, “आम्ही त्याचे संगोपन केले आणि अखेरीस वापरकर्त्याच्या हवाली केले,” असे म्हटले. ‘J-10CE’ हे ४.५ पिढीतील प्रगत लढाऊ विमान मानले जाते. चीनबाहेर या विमानांचा वापर करणारा पाकिस्तान हा एकमेव देश असून, पाकिस्तानने २०२० मध्ये अशा ३६ विमानांची मागणी केली होती.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या ताज्या अहवालानुसार, चीनने माहिती युद्ध, सायबर कारवाया, गुप्तचर मदत आणि राजनैतिक डावपेचांच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. उपग्रह कव्हरेज आणि इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवण्याच्या माहितीद्वारे पाकिस्तानची लक्ष्यभेदी क्षमता आणि ऑपरेशनल समन्वय वाढवण्यात मदत झाल्याचे मानले जात आहे.
मात्र, इतक्या मोठ्या तांत्रिक मदतीनंतरही पाकिस्तान भारतापुढे टिकू शकला नाही, असा दावा भारतीय संरक्षण सूत्रांकडून करण्यात येत आहे.(China Helped Pakistan During Operation Sindoor)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.