TMC Bengal Political Crisis : बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ; पराभवानंतर टीएमसीमध्ये नाराजी, ममता बॅनर्जींसमोर पक्ष एकसंघ ठेवण्याचे आव्हान!

Total Views |
TMC Bengal Political Crisis
 
मुंबई : (TMC Bengal Political Crisis) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस समोर नवे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जी यांनी या पराभवासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, त्यांनी इंडिया आघाडीसोबतही संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.(TMC Bengal Political Crisis)
 
राज्यात भाजपने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवत मोठे यश संपादन केले, तर टीएमसीला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. चंद्रिमा भट्टाचार्य, शशी पांजा, अरूप बिस्वास, सुजित बोस आणि ब्रात्य बसू यांसारख्या प्रमुख चेहऱ्यांना आपले मतदारसंघ राखण्यात अपयश आले.(TMC Bengal Political Crisis)
 
निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, त्यांच्या जवळच्या दहा आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. काही आमदारांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात थांबण्याचे कारण दिले, तर काहींनी वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थिती दर्शवली.(TMC Bengal Political Crisis)
 
हेही वाचा : US Iran Naval Clash : होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन युद्धनौकांवर हल्ला! ट्रम्पचा मोठा दावा - ‘इराणचे प्रचंड नुकसान’ 
 
दरम्यान, पक्षातील अंतर्गत वादही उघडपणे समोर येऊ लागले आहेत. कुचबिहारमधील वरिष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी आपल्या पराभवासाठी उदयन गुहा यांना जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. तसेच फरक्का येथील माजी आमदार मोनिरुल इस्लाम यांनी तिकीट नाकारल्यामुळे पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.(TMC Bengal Political Crisis)
 
या सर्व घडामोडींमुळे टीएमसीमध्ये अंतर्गत असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत असून, आगामी काळात पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(TMC Bengal Political Crisis)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com