मुंबई : (Chandrashekhar Bawankule Meets Raj Thackeray) महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र, ही केवळ सद्धिच्छा भेट असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मी राज ठाकरे यांना केवळ सदिच्छा भेट दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मी निवडून आल्यापासून, मंत्री झाल्यापासून आमच्यात दोन-चार वेळा चर्चा झाली. मला तुमच्याकडे चहा घ्यायला यायचे आहे, असे मी त्यांना सांगितले होते.
Mumbai, Maharashtra: Minister Chandrashekhar Bawankule says, "Under Mamata Banerjee’s rule, there was a situation of jungle raj. I express my gratitude to the people and voters there for supporting those working for India. The situation had become so bad that it seemed West… pic.twitter.com/v1Ta7jqXHk
राज ठाकरे यांनी चर्चेसाठी आणि चहा घेण्यासाठी मला वेळ दिला. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त मैत्री म्हणून ही भेट झाली. त्यांनी माझा चांगल्या पद्धतीने सन्मान केला. राज ठाकरे आणि माझी मैत्री अबाधित असून या मैत्रीमुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....