मुंबई : (Assembly Election Results 2026) एका केंद्रशासित प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, मतमोजणीला सुरुवात होताच देशभरातील राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सुरुवातीचे कल पाहता अनेक राज्यांमध्ये चुरशीची लढत दिसून येत असली, तरी काही ठिकाणी सत्तांतराची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.(Assembly Election Results 2026)
बंगालमध्ये रंगतदार लढत, भाजपची आघाडी
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सुरुवातीपासूनच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, ताज्या कलांनुसार भाजपने लक्षणीय आघाडी घेतली असून, सत्तांतराची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.(Assembly Election Results 2026)
राज्यात एकूण २९४ जागांसाठी मतदान झाले होते. त्यापैकी १५२ जागांसाठी पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी, तर १४२ जागांसाठी दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडला. एका जागेवर फेरमतदान होणार असल्याने आज २९३ जागांचे निकाल घोषित होत आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारीही लक्षणीय राहिली, ज्यामुळे निकालांबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.(Assembly Election Results 2026)
आसाममध्ये एनडीएची ‘हॅट्ट्रिक’ जवळ?
आसाममध्ये १२६ विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीएआघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची मोठी संधी असल्याचे चित्र दिसत आहे.
८५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यामुळे जनतेने मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. दुसरीकडे काँग्रेसनेही दशकभराचा सत्तेपासूनचा ‘वनवास’ संपवण्याच्या निर्धाराने जोरदार प्रचार केला होता, मात्र सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने झुकताना दिसत आहेत.(Assembly Election Results 2026)
तामिळनाडूत डीएमके आघाडीवर, पण लढत तुफान
तामिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले. ८५.१४ टक्के इतके विक्रमी मतदान झाल्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.(Assembly Election Results 2026)
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक (DMK) आघाडीवर असल्याचे कल सूचित करतात. तर विरोधी एनडीए आघाडीचे नेतृत्व एआयएडीएमके करत आहे. याशिवाय थलपथी विजय यांच्या टीव्हीके पक्षामुळे मतांचे विभाजन होऊन लढत अधिकच रंगतदार बनली आहे.(Assembly Election Results 2026)
केरळमध्ये १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. ७८.२७ टक्के मतदानासह राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या कलांनुसार येथे यूडीएफ आघाडीवर असल्याचे दिसत असून, सत्तांतराची शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळमधील पारंपरिक राजकीय संघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.(Assembly Election Results 2026)
पुदुचेरीत एनडीए टिकणार का?
पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात ३० जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान झाले. येथे तब्बल ८९.९७ टक्के मतदानाची नोंद झाली, जी अत्यंत उल्लेखनीय मानली जाते. मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार की विरोधक बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Assembly Election Results 2026)
एकूण चित्र काय सांगते?
या पाच राज्यांतील निकाल देशाच्या राजकीय दिशेचे संकेत देणारे ठरणार आहेत. उत्तर-पूर्वेत एनडीएची पकड मजबूत होताना दिसत आहे, तर दक्षिणेत अजूनही चुरशीची लढत कायम आहे. बंगालसारख्या मोठ्या राज्यात सत्ता बदलाचे संकेत मिळत असल्याने राष्ट्रीय राजकारणावरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.(Assembly Election Results 2026)
आजचा दिवस केवळ निकालांचा नसून, पुढील काही वर्षांसाठी भारताच्या राजकीय समीकरणांचा मार्ग ठरवणारा ठरणार आहे.
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.