मुंबई : (West Bengal BJP War Room Strategy) २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल हे केवळ राजकीय परिवर्तन नसून, आधुनिक निवडणूक रणनीतीचे एक ठळक उदाहरण ठरले आहे. या निवडणुकीत भाजपने प्रचंड यश मिळवत टीएमसीच्या दीर्घकालीन सत्तेला मोठा धक्का दिला आहे. या विजयामागे केवळ सभांचा प्रभाव नसून, कोलकाता आणि दिल्लीतील अत्याधुनिक ‘वॉर रूम’ रणनीती निर्णायक ठरल्याचे समोर आले आहे.(West Bengal BJP War Room Strategy)
भाजपच्या या संपूर्ण निवडणूक मोहिमेचे केंद्रबिंदू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ‘बूथ पातळीवर विजय’ ही संकल्पना होती. त्यांनी बंगालमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती ठेवत संघटनात्मक रचनेवर काटेकोर लक्ष दिले. दिल्ली आणि कोलकाता येथील वॉर रूममध्ये २४ तास डेटा विश्लेषण करून प्रत्येक बूथचा फीडबॅक थेट नेतृत्वापर्यंत पोहोचवला जात होता.(West Bengal BJP War Room Strategy)
या मोहिमेत भाजपचे प्रमुख रणनीतीकार भूपेंद्र यादव यांनी ‘पन्ना प्रमुख’ मॉडेल राबवत स्थानिक पातळीवर पक्षाची पकड मजबूत केली. तर सुनील बन्सल यांनी टीएमसीविरोधी असंतोष असलेल्या मतदारांवर लक्ष केंद्रित करून सूक्ष्म स्तरावर प्रचाराची आखणी केली.(West Bengal BJP War Room Strategy)
उद्योग आणि सीमावर्ती भागांवर धर्मेंद्र प्रधान यांनी रणनीती आखली, तर डॉ. महेश शर्मा यांनी शहरी आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये पक्षाची प्रतिमा मजबूत करण्यावर भर दिला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घुसखोरी आणि नागरिकत्व यांसारख्या मुद्द्यांवर आक्रमक प्रचार करत राजकीय वातावरण अधिक तीव्र केले.(West Bengal BJP War Room Strategy)
टीएमसीचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने केवळ पारंपरिक मतपेढीवरच नव्हे, तर महिला मतदार आणि असंतुष्ट घटकांवरही विशेष लक्ष दिले. संदेशखालीसारख्या मुद्द्यांचा निवडणूक प्रचारात प्रभावी वापर करण्यात आला. तसेच ग्रामीण भागात शुभेंदू अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवून मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला.(West Bengal BJP War Room Strategy)
या संपूर्ण रणनीतीमुळे टीएमसीची पारंपरिक ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. डिजिटल डेटा, सूक्ष्म व्यवस्थापन आणि स्थानिक स्तरावरील संघटन या तिन्ही घटकांचा प्रभावी संगम भाजपच्या विजयामागे निर्णायक ठरला आहे.(West Bengal BJP War Room Strategy)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.