हिंदू बहुत ही डरपोक कौम हैं. धुरंधर चित्रपटातला हा डायलॉग तुम्हीही ऐकलाच असेल. पण आता हा हिंदू या जिहाद्यांना पुरून उरेल. यात काही शंका नाही. गाझियाबादमध्ये एका जिहाद्याच्या केलेल्या एन्काऊंटरमधून हा स्पष्ट संदेश देण्यात आलाय. बकरी ईदच्या दिवशीच म्हणजेच २८ मे रोजी काही कट्टरपंथींनी एका हिंदू अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. गाझियाबादच्या खोडा परिसरात १७ वर्षीय सूर्या चौहानच्या हत्येचे मोठे पडसाद उत्तर प्रदेश आणि देशभरात उमटले होते. बकरी ईदच्या दिवशी घडलेल्या या धक्कादायक हत्याकांडानंतर स्थानिकांचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचा संताप पाहायला मिळाला होता. या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांनी गजाआड केले होते, मात्र मुख्य आरोपी असद फरार झाला होता. अखेरीस सूर्याला न्याय मिळाला आणि रविवारी पहाटे असदचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला. नेमकं बकरी ईदच्या दिवशी काय घडलं होतं तेही जाणून घेऊयात... (Surya Chauhan Case)
सूर्या चौहान याला मुख्य आरोपी असद याने बकरी ईदच्या निमित्ताने फोन करुन बोलावले होते. सुरुवातीला हा केवळ भेटीचा प्रसंग असल्याचे वाटत होते, मात्र त्यानंतर या जिहादी मानसिकतेच्या आरोपींनी सुर्याला, "तुने कभी बकरा हलाल होते देखा है? आओ दिखाते है" असं सांगत, त्याच्यावर अचानक चाकूने हल्ला करायला सुरूवात केली. जखमी अवस्थेत सुर्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे सगळं इथेच थांबलं नाही. तर जिहादी मानसिकता असलेला मुख्य आरोपी असद याने या हत्येनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केलाय ज्यात तो म्हणतोय "तुम्हारे भाईने आज मर्डर कर दिया है, सारे भाई प्यार देना." आता इथूनच या तरुणाच्या मानसिकतेच दर्शन होतयं. सूर्याच्या हत्येचे तीव्र पडसाद गाझिबादमध्ये उमटले. सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हते, मात्र पोलिस आणि प्रशासनाने त्यांना समजावून सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास संमती दिली. आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सुर्याला न्याय मिळवून देण्यासाठी १० तासांचं आंदोलन केलं.सूर्याच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. (Surya Chauhan Case)
या व्हिडिओमध्ये काही तरुण सूर्य चौहान यांच्यावर हल्ला करताना स्पष्ट दिसतायत. यानंतर पोलिसांनीही तातडीनं तपासाला सुरुवात केली. १७ वर्षीय सूर्या चौहान हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सूर्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हल्ल्यात काही ओळखीचे तरुण सहभागी होते. त्यापैकी तिघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र मुख्य आरोपी असद फरार होता. मुख्य आरोपी असद याच्याविरुद्ध शोध मोहीम राबवण्यात आली मात्र दोन दिवस तो पोलिसांना चकवा देत होता. असदच्या अटकेसाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. याच काळात असद शहर सोडून पळण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Surya Chauhan Case)
रविवारी ३१ मे रोजी पहाटे चार वाजता पोलिसांनी खोडा परिसरात सापळा रचला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे असद हा आपल्या एका साथीदारासह मोटरसायकलवरून परिसरात येणार असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, मात्र पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, त्याने उलट गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या चकमकीत असद गंभीर जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या चकमकीच एका पोलीस हवालदारालाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक मोटरसायकल आणि गावठी पिस्तूल जप्त केले आहे. मात्र, असदचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सध्या पोलिसांनी गाझियाबाद परिसरात सुरक्षा वाढवली असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. सूर्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. असदच्या एन्काऊंटरनंतर भाजपचे माजी आमदार संगीत सोम म्हणाले की, हे कृत्य जिहादी मानसिकतेतून करण्यात आले. एका अल्पवयीन मुलाची हत्या करुन जिहादी मानसिकतेला बळ देण्याचा प्रयत्न होत होता. गाझियाबाद पोलिसांनी कारवाी करत ही मानसिकता मोडून काढली आहे. या संपूर्ण घटनेतून तरुणांतील वाढता हिंसाचार, जिहादी मानसिकताया सारखे प्रश्न पुन्हा पुढे आले आहेत. या मानसिकतेला लवकारच आळा घालण्याची प्रचंड गरज आहे. या प्रकरणात गाझियाबाद पोलीसांनी आरोपीला चांगलाच धडा शिकवला आहे. (Surya Chauhan Case)