"बकरा हलाल होताना पाहिलंय?"; गाझियाबादेत धर्मांधतेचा अतिरेक! १७ वर्षीय हिंदू युवकाची हत्या

    30-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाझियाबादच्या खोडा येथे हिंदू युवक सूर्या चौहान याची पोटात सुरा खुपसून हत्या करणात आली. या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला असून त्यांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आणखी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य आरोपी असद आणि त्याचे कुटुंबीय फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्या चौहानच्या हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले. या चित्रफितीत बकरी ईदच्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी आणि सूर्या यांच्यात वाद होत असल्याचे दिसत आहे. अनेक युवकांनी त्याला घेरल्याचेही दिसते. त्यानंतर सूर्यावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. दिल्लीतील उत्तम नगर येथे होळीच्या दिवशी रंग उधळण्याच्या कारणावरून एका हिंदू युवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्याच धर्तीवरील आणखी एक घटना आता गाझियाबादच्या खोडा परिसरात घडताना दिसते आहे.

सूर्या याच्या आईच्या म्हणण्यानुसार, असद नावाच्या युवकाने त्यांच्या मुलाला बकरी ईदच्या दिवशी आपल्या घरी बोलावले होते. तेथे अरशदने सूर्याकडे, “तू कधी बकरा हलाल होताना पाहिला आहेस का?” असा प्रश्न विचारला. सूर्याने “नाही” असे उत्तर देताच त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर सूर्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नामनिर्देशित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, काही जणांची चौकशी सुरू आहे.

घटना समोर आल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला. विविध हिंदू संघटनांकडून सातत्याने आंदोलन केले जात असून, तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि हिंदू संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बकरा नाही; तर 'बकऱ्याचा केक' कापून ईद साजरी
गाझियाबादच्याच लोनी परिसरात मात्र ईद वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी पर्यावरणपूरक ईद साजरी करण्याचे केलेले आवाहन अनेक मुस्लिम कुटुंबांनी स्वीकारले. त्यांनी बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी बकऱ्याचे छायाचित्र असलेला केक कापून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. लोनी येथील खालिद, चांद, अरबाज, कमरुद्दीन अन्सारी, हाजी लियाकत, हाजी बाबू आणि इतर नागरिकांनी मिळून हा उपक्रम राबवला. समाज आणि पर्यावरणाचा विचार करून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. काळानुरूप बदल आवश्यक असून निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक