मुंबई : (Modi Government Major Decisions) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने १२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, या काळात देशाच्या राजकारण, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक धोरणांमध्ये अनेक मोठे बदल घडून आले. २०१४ मध्ये “अच्छे दिन”च्या घोषणेसह सत्तेत आलेल्या मोदी सरकारने अनेक धाडसी आणि चर्चित निर्णय घेत देशाच्या धोरणात्मक दिशेलाच नवा आकार दिला.(Modi Government Major Decisions)
१. अयोध्येत राम मंदिर उभारणी
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येतील राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. केंद्र सरकारने ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. हा निर्णय भाजपच्या सांस्कृतिक आणि राजकीय अजेंड्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.(Modi Government Major Decisions)
२. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केली. त्यानंतर पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बालाकोट एअर स्ट्राइक करण्यात आली.या कारवायांमुळे भारताने दहशतवादाविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचा संदेश दिला.(Modi Government Major Decisions)
३. महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण
मोदी सरकारने संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करत लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा केला. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या निर्णयामुळे महिलांचा राजकीय सहभाग वाढेल, असा सरकारचा दावा आहे. ग्रामीण भागापासून राष्ट्रीय राजकारणापर्यंत महिलांना नेतृत्वाच्या अधिक संधी मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Modi Government Major Decisions)
४. अग्निपथ योजना आणि ‘अग्निवीर’ मॉडेल
भारतीय सैन्य अधिक तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘अग्निपथ योजना’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात सेवा देण्याची संधी देण्यात आली. या योजनेला देशातील अनेक भागांत विरोध झाला. कायमस्वरूपी नोकरीच्या संधी कमी झाल्याचा आरोप युवकांनी केला. मात्र सरकारच्या मते, यामुळे सैन्य अधिक आधुनिक आणि गतिमान होईल.(Modi Government Major Decisions)
५. नोटाबंदी निर्णय
८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवादी निधी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे देशभरात बँका आणि एटीएमसमोर मोठ्या रांगा लागल्या. रोख टंचाईमुळे सामान्य नागरिक आणि छोट्या व्यवसायांना फटका बसला. मात्र, डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंट प्रणालीला मोठी चालना मिळाली.(Modi Government Major Decisions)
६. GST: ‘वन नेशन, वन टॅक्स’ची अंमलबजावणी
१ जुलै २०१७ पासून देशात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. याआधी विविध प्रकारचे अप्रत्यक्ष कर अस्तित्वात होते. GST मुळे देशभरात एकसमान करप्रणाली लागू झाली. सुरुवातीच्या काळात व्यापाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र सरकारच्या मते, या व्यवस्थेमुळे करप्रणाली अधिक पारदर्शक झाली आणि महसूल वाढीस मदत झाली.
७. जम्मू-कश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ए रद्द केले. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. सरकारच्या मते, या निर्णयामुळे देशात “एक देश, एक संविधान” ही संकल्पना प्रत्यक्षात आली.
या निर्णयानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली, इंटरनेट सेवा काही काळ बंद ठेवण्यात आल्या आणि अनेक स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. समर्थकांच्या मते यामुळे दहशतवादावर नियंत्रण मिळाले, तर विरोधकांनी याला संघराज्य व्यवस्थेवरील हस्तक्षेप म्हटले.(Modi Government Major Decisions)
८. तीन तलाकविरोधी कायदा
मोदी सरकारने मुस्लिम महिलांना तात्काळ तिहेरी तलाकपासून संरक्षण देण्यासाठी कायदा लागू केला. एका वेळी तीन तलाक देण्याची पद्धत बेकायदेशीर आणि दंडनीय घोषित करण्यात आली. सरकारने याला महिला सक्षमीकरणाचा निर्णय म्हटले, तर काही धार्मिक संघटनांनी वैयक्तिक कायद्यांमध्ये हस्तक्षेप असल्याची टीका केली.
९. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)
२०१९ मध्ये लागू करण्यात आलेल्या CAA अंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या गैर-मुस्लिम अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली. या कायद्याविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. शाहीन बाग आंदोलन राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले.(Modi Government Major Decisions)
१०. डिजिटल इंडिया आणि जनधन योजना
‘डिजिटल इंडिया’ मोहिमेमुळे देशात डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली. यूपीआय व्यवहारांमध्ये भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक बनला. जनधन योजनेअंतर्गत कोट्यवधी नागरिकांची बँक खाती उघडण्यात आली. गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात सरकारला मोठे यश मिळाले.
११. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी १०% आरक्षण
मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्ण समाजासाठी १० टक्के आरक्षण लागू केले. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्याचा हा पहिला मोठा निर्णय मानला जातो.(Modi Government Major Decisions)
१२. नवीन शिक्षण धोरण आणि न्यायव्यवस्थेतील बदल
३४ वर्षांनंतर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले. कौशल्याधारित शिक्षण, मातृभाषेत शिक्षण आणि लवचिक अभ्यासक्रम यावर भर देण्यात आला.तसेच IPC, CrPC आणि Evidence Act यांसारखे ब्रिटिशकालीन कायदे बदलून भारतीय न्याय संहिता (BNS) आणि नवीन कायदे लागू करण्यात आले. सरकारच्या मते, हा न्यायव्यवस्थेच्या भारतीयीकरणाचा महत्त्वाचा टप्पा आहे.
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांनी देशात मोठे राजकीय आणि सामाजिक बदल घडवले. समर्थक या निर्णयांना “विकसित भारत”ची पायाभरणी मानतात, तर विरोधक काही निर्णयांवर लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समतेच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करतात.(Modi Government Major Decisions)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.