पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ; १० दिवसांत चौथी वाढ, बजेटवर मोठा परिणाम!

Total Views |
Petrol Diesel Price Hike
 
मुंबई : (Petrol Diesel Price Hike) देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका बसला आहे. आज प्रति लिटर इंधनाच्या किमतीत तब्बल २.७१ रुपयांची वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसांत झालेली ही चौथी दरवाढ असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Petrol Diesel Price Hike)
 
याआधी १५ मे रोजी जवळपास ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ आणि २३ मे रोजीही दर वाढले होते. सततच्या वाढीमुळे वाहनचालक, मालवाहतूक व्यवसाय आणि मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.(Petrol Diesel Price Hike)
 
LPG ग्राहकांना तात्पुरता दिलासा
 
दरम्यान, घरगुती LPG सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७ मार्च २०२६ रोजी शेवटची ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींमध्ये याआधी मोठी वाढ झाली होती. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला आहे.(Petrol Diesel Price Hike)
 
पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम
 
इराण-पश्चिम आशिया संघर्ष आणि होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि LPG च्या किमती सतत चढ-उतार अनुभवत आहेत. सरकारी तेल कंपन्या वाढत्या जागतिक किमतींचा काही भार स्वतः सहन करत असल्याचे सांगितले जात असले, तरी भविष्यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Petrol Diesel Price Hike)
 
प्रमुख शहरांतील LPG दर
दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडर ९१३ रुपये तर मुंबईत ९१२.५ रुपये आहे. कोलकात्यात ९३९ रुपये, चेन्नईत ९२८.५ रुपये आणि पटण्यात सर्वाधिक १००२.५ रुपये दर नोंदवण्यात आला आहे. कमर्शियल सिलेंडरचे दरही अनेक शहरांत ३ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत.(Petrol Diesel Price Hike)
 
महागाईच्या चिंतेत वाढ
 
इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक, भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी वाढू शकते, अशी भीती अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.(Petrol Diesel Price Hike)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com