नीट पेपरफुटीच्या धक्क्याने लातूरमध्ये १८ वर्षीय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल..., सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

Total Views |
 
NEET 2026 Paper Leak
 
लातूर: (NEET 2026 Paper Leak) नीट पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या घोटाळ्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिष्ट होऊन, एका होतकरू डॉक्टर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थीनीने आपले जीवन संपवले आहे. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील १८ वर्षीय मैथिली सोनवणे या विद्यार्थिनीने पेपरफुटीच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले, ज्यामुळे आता राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. (NEET 2026 Paper Leak)
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १६ मे रोजी सकाळी मैथिली आपल्या शेताकडील घरी गेली होती. काही वेळानंतर ती घराजवळील झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. नातेवाईकांनी तिला तत्काळ खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तिच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून तपास सुरू केला आहे. (NEET 2026 Paper Leak)
 
मैथिलीने दयानंद कॉलेज, लातूर येथून नीट परीक्षा दिली होती. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तिने यंदा १२ वी विज्ञान शाखेत ५१.५० टक्के गुण मिळवले होते. तिला डॉक्टर बनण्याची तीव्र इच्छा होती. तिने ३ मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. मात्र पेपरफुटीच्या वादामुळे ती परीक्षा रद्द झाली. २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार असल्याने ती प्रचंड नैराश्यात होती. (NEET 2026 Paper Leak)
 
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय? (NEET 2026 Paper Leak)
 
तिच्या म्हणण्याप्रमाणे, पेपर उत्तम गेला, परंतु पेपरफुटीची बातमी आणि परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय याने तिच्यावर अत्यंत भयंकर ताण टाकला. कुटुंबीयांशी बोलताना ती वारंवार म्हणत होती, “माझा अभ्यास चांगला झाला होता, पेपर सोपा गेला, आता पुढे काय होणार?” (NEET 2026 Paper Leak)
 
नीट घोटाळ्याची पार्श्वभूमी... (NEET 2026 Paper Leak)
 
CBI पेपरफुटीच्या राष्ट्रीय घोटाळ्याची कसून चौकशी करत आहेत. आरोपींपैकी ७ जण महाराष्ट्रातील आहेत. लातूरच्या RCC कोचिंगसह पुणे, नाशिक, अहिल्यानगरमधील गटांवरही कारवाई झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान (सीकर), उत्तर प्रदेश (लखीमपूर), दिल्ली (आदर्श नगर), कर्नाटक (कलबुर्गी) या भागांतही नीट टेन्शन आणि अनिश्चिततेतून विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलेल्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता मैथिली आणि इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने शिक्षण माफिया आणि परीक्षा व्यवस्थेविरुद्ध संताप अधिकच वाढवला आहे. (NEET 2026 Paper Leak)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com