महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि मान्सूनपूर्व वादळी पाऊस एकाच वेळी; विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट, तर कोकणात वादळी वारे...

Total Views |
 
Maharashtra Weather Updates
 
मुंबई: (Maharashtra Weather Updates) महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत उष्णतेची तीव्र लाट आणि कोकण–मराठवाड्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस अशी दुहेरी हवामानस्थिती पाहायला मिळाली. विदर्भातील काही भागांत भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वारे, गडगडाट आणि विजांसह पाऊस झाला. (Maharashtra Weather Updates)
 
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार.... (Maharashtra Weather Updates)
 
विदर्भात दोन दिवसांपासून तापमान सतत ४०°C वर राहिले आहे.
 
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे २३ मे रोजी ४७.१°C रेकॉर्ड तापमान नोंदवले गेले.
 
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांत रात्रीसाठी रेड अलर्ट जाहीर; अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट. (Maharashtra Weather Updates)
 
रात्रीचे किमान तापमान ३०–३२°C इतके राहण्याचा अंदाज आहे.
 
पुढच्या काही दिवसांचा अंदाज... (Maharashtra Weather Updates)
 
२४–२५ मे २०२६ दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्र (पुणे, बीड, सोलापूर, लातूर, धारशिव, अहमदनगर) आणि मराठवाड्याच्या काही भागांत – वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता. (Maharashtra Weather Updates)
 
२५ मे रोजी विदर्भात उष्णतेची लाट आणि रात्रीची उष्णता यासाठी पुन्हा रेड आणि ऑरेंज अलर्ट कायम. (Maharashtra Weather Updates)
 
त्यासोबतच, नैऋत्य मोसमी वारे अजून भारताच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचलेले नाहीत. श्रीलंकेचा बराचसा भाग मान्सूनने व्यापलेला, पुढच्या तीन–चार दिवसांत अरबी समुद्र–कोकणकडे मान्सूनची प्रगती अनुकूल असल्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Updates)
 
२१ ते २८ मे दरम्यान, विदर्भात उष्णतेची तीव्रता जाणवेल; राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता. (Maharashtra Weather Updates)
 
२८ मे ते ४ जून दरम्यान, उन्हाळा हळूहळू कमी होईल, रात्रीचे तापमान थोडे वरच राहेल. (Maharashtra Weather Updates)
 
पश्चिम कोकण–कोहलापुरी किनारपट्टीपासून जूनच्या मध्यापर्यंत मान्सूनची प्रगती आणि साधारणपणे जून मध्ये जोरात पाऊस सुरू होईल, पण सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Updates)
 
युनायटेड किंगडमच्या रेडिंग विद्यापीठातील हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदा जून–सप्टेंबर या चार महिन्यांत मासिक सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Updates)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com