मुंबई : (CJP Supreme Court Controversy) देशभरात सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या डिजिटल मोहिमेचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एका वकिलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला “हे इतकं भावनिकपणे घेऊ नका” असा सल्ला दिला. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळी याचिकांची सविस्तर तपासणी केली जाईल, असे स्पष्ट केले.(CJP Supreme Court Controversy)
न्यायपालिकेविरोधात ‘द्वेषपूर्ण नैरेटिव्ह’चा आरोप
सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, CJI सूर्यकांत यांच्या ‘कॉकरोच’ संदर्भातील वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत न्यायपालिकेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. न्यायालयातील चर्चांचा व्यावसायिक किंवा राजकीय हेतूंसाठी वापर रोखावा, अशी मागणी करण्यात आली असून काही याचिकांमध्ये बनावट कायद्याच्या पदव्यांच्या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच, सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या मोहिमेच्या कारवायांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी दुसऱ्या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.(CJP Supreme Court Controversy)
CJI यांच्या वक्तव्यावरून निर्माण झाला वाद
हा संपूर्ण वाद सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यापासून सुरू झाला. काही लोक बनावट आणि बोगस पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात प्रवेश करत असल्याचा उल्लेख करताना त्यांनी ‘कॉकरोच’ हा शब्द वापरल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. त्यानंतर हे वक्तव्य संदर्भाबाहेर नेल्याचा दावा करत CJI यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांचा उद्देश बेरोजगार युवकांवर टीका करणे नसून न्याय व्यवस्थेची प्रतिमा खराब करणाऱ्यांवर भाष्य करणे होता.(CJP Supreme Court Controversy)
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाची व्यंग्यात्मक मोहीम सुरू झाली. सुरुवातीला हा केवळ उपहासात्मक डिजिटल प्रयोग मानला जात होता; मात्र काही दिवसांतच बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि युवा असंतोष व्यक्त करणारे मोठे ऑनलाइन व्यासपीठ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली.
या मोहिमेमध्ये मीम्स, व्यंगचित्रे, राजकीय टीका आणि सोशल मीडिया मोहिमांचा वापर करून युवकांशी थेट संवाद साधला जात आहे. NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत CJP ने अलीकडे मोठी ऑनलाइन याचिका सुरू केली होती.(CJP Supreme Court Controversy)
वेबसाइट बंद
दरम्यान, शनिवारी CJP ची अधिकृत वेबसाइट अचानक बंद झाल्यानंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सरकारवर गंभीर आरोप केले. भारताबाहेर वास्तव्यास असलेल्या दीपके यांनी “हुकूमशाही पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे” असा दावा केला. या मोहिमेमुळे स्वतःला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, परीक्षेतील गैरव्यवहारांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित यंत्रणा या व्यंगात्मक आंदोलनालाच लक्ष्य करत आहेत.(CJP Supreme Court Controversy)
युवकांमध्ये प्रचंड लोकप्रियता
सध्या इंस्टाग्रामवर CJP चे २२ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स असल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः मिलेनियल्स आणि Gen-Z युवकांमध्ये ही मोहीम वेगाने लोकप्रिय होत आहे. पर्यायी सोशल मीडिया खात्यांवरून शेअर केलेल्या माहितीनुसार, अवघ्या एका आठवड्यात “१० लाख नोंदणीकृत कॉकरोच” या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे या मोहिमेने म्हटले आहे.
काही जण याकडे युवकांच्या डिजिटल असंतोषाचा उद्रेक म्हणून पाहत आहेत, तर काहींच्या मते ही केवळ सोशल मीडियावर आधारित व्यंगात्मक आणि राजकीय प्रतिक्रिया आहे.(CJP Supreme Court Controversy)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.