मुंबई : (China Coal Mine Blast) उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतात एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात किमान ९० कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, टोंगझोऊ ग्रुपच्या मालकीच्या लिउशेन्यू कोळसा खाणीत हा स्फोट झाला. घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.(China Coal Mine Blast)
स्फोटावेळी खाणीत २४७ कामगार उपस्थित
ही दुर्घटना शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७:२९ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी खाणीत सुमारे २४७ कामगार काम करत होते. अचानक झालेल्या गॅस स्फोटामुळे अनेक जण अडकले. काहींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(China Coal Mine Blast)
कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण वाढल्याचा संशय
सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, खाणीत अत्यंत विषारी आणि गंधहीन कार्बन मोनोऑक्साइड वायूचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले होते. याच कारणामुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.(China Coal Mine Blast)
घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्यासह अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.(China Coal Mine Blast)
३४५ बचाव कर्मचारी घटनास्थळी
चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने सहा विशेष बचाव पथकांसह ३४५ बचाव कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले आहे. सरकारी माध्यमांनी प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बचाव कर्मचारी, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत असल्याचे दिसून आले.(China Coal Mine Blast)
चीनच्या खाण उद्योगावर पुन्हा प्रश्नचिन्ह
शांक्सी प्रांत हा चीनच्या कोळसा उत्पादनाचा प्रमुख केंद्र मानला जातो. गेल्या दोन दशकांत चीनमध्ये अनेक खाण दुर्घटना घडल्या असून त्यानंतर सुरक्षा नियम कडक करण्यात आले होते. मात्र, या ताज्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा चीनच्या खाण सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(China Coal Mine Blast)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.