मुंबई : (Hamza Burhan Pulwama Terrorist) २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असल्याचा आरोप असलेला आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत असलेला हमजा बुरहान उर्फ अर्जुमंद गुलजार दार याची पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (POK) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मुझफ्फराबादमध्ये भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
मोटारसायकलवरून आले, कार अडवली आणि तुफान गोळीबार
सूत्रांच्या माहितीनुसार, हमजा बुरहान आपल्या कारमधून जात असताना मुझफ्फराबादमधील AIMS कॉलेज परिसरात वाहतूक कोंडीत त्याची गाडी अडकली होती. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या वाहनावर अचानक गोळीबार सुरू केला. काही सेकंदांत अनेक गोळ्या झाडण्यात आल्या आणि हमजाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी कथितरित्या बुर्का परिधान केला होता, असा दावा काही स्थानिक माध्यमांनी केला आहे. या घटनेचे कथित CCTV फुटेजही समोर आले असले तरी त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
कोण होता हमजा बुरहान?
हमजा बुरहानचे खरे नाव अर्जुमंद गुलजार दार होते. तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा भागातील रहिवासी होता. तो वैध कागदपत्रांवर पाकिस्तानात गेला आणि नंतर अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला. पुढे तो संघटनेचा सक्रिय कमांडर बनला. भारत सरकारने २०२२ मध्ये त्याला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
तो ‘डॉक्टर’ या नावानेही ओळखला जात असे. काही काळ तो मुझफ्फराबादमधील अब्बास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, त्याचवेळी तो दहशतवादी कारवायांचे नियोजन, युवकांची भरती आणि निधी उभारणीचे काम करत असल्याचा आरोप भारतीय यंत्रणांनी केला होता.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद डार याने स्फोटकांनी भरलेली SUV जवानांच्या बसवर आदळवली होती. या भीषण हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. भारताने त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई कारवाई केली होती.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हमजा बुरहान हा पुलवामा कटातील महत्त्वाच्या सूत्रधारांपैकी एक मानला जात होता. त्याच्यावर २०२० मध्ये पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचा कट रचल्याचाही आरोप होता.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
बुरहान वानी, जाकिर मूसा यांच्याशी जवळचे संबंध
हमजा बुरहानचे नाव अनेक कुख्यात दहशतवाद्यांशी जोडले गेले होते. तो बुरहान वानी, जाकिर मूसा, अबू कासिम आणि अबू दुजाना यांचा निकटवर्तीय मानला जात होता. सुरक्षा यंत्रणांच्या मते, काश्मीरमध्ये कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्यात आणि तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यामध्ये त्याची मोठी भूमिका होती.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या रहस्यमय हत्या वाढल्या
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानात अनेक मोठ्या दहशतवाद्यांच्या संशयास्पद हत्या झाल्या आहेत. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित कमांडर अज्ञात हल्लेखोरांचे लक्ष्य बनत आहेत. काहींचा मृत्यू गोळीबारात झाला, तर काही कथित अपघातांमध्ये मारले गेले. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
सुरक्षा वाढवली, पण प्रश्न कायम
हमजा बुरहानच्या हत्येनंतर मुझफ्फराबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागे नेमकं कोणाचं नियोजन होतं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली असून, पुलवामा हल्ल्याच्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.(Hamza Burhan Pulwama Terrorist)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.