मुंबई: (Cockroach Janta Party) देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात CJP ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. अवघ्या काही दिवसांत या व्यंग्यात्मक ऑनलाइन मोहिमेने इन्स्टाग्रामवर १ कोटीहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून, फॉलोअर्सच्या संख्येत सर्वांनाच मागे टाकल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील या वेगवान वाढीमुळे राजकीय आणि डिजिटल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.(Cockroach Janta Party)
एका वक्तव्यातून सुरू झाली ‘CJP’ची मोहिम
या मोहिमेची सुरुवात १६ मे रोजी झाली. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुणांविषयी बोलताना कथितरित्या ‘कॉकरोच’ हा शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. त्याविरोधात अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत “सर्व कॉकरोच एकत्र आले तर?” असा सवाल उपस्थित केला. यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने ऑनलाइन मोहिम सुरू झाली आणि ती काही तासांतच व्हायरल झाली.(Cockroach Janta Party)
एक्स अकाउंट बंद; इन्स्टाग्रामवर मात्र प्रचंड प्रतिसाद
CJP चे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट बंद करण्यात आले असून, अकाउंटवर “लीगल डिमांडमुळे अकाउंट विथहेल्ड” असा संदेश दिसत आहे. संस्थापक अभिजीत दीपके यांनी दावा केला की, आधी अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आणि तो अपयशी ठरल्यानंतर अकाउंट बंद करण्यात आले. एक्सवर या पेजचे लाखो फॉलोअर्स होते, तर इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या १३ मिलियनच्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.(Cockroach Janta Party)
कोण आहेत अभिजीत दीपके?
CJP चे संस्थापक अभिजीत दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कार्यरत असून, सोशल मीडिया आणि डिजिटल कॅम्पेन क्षेत्रात काम करतात. याआधी त्यांनी काही राजकीय पक्षांच्या डिजिटल मोहिमांमध्येही सहभाग घेतल्याची माहिती समोर आली आहे.(Cockroach Janta Party)
CJP ने स्वतःचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे. त्यात संसदेत महिलांना ५० टक्के आरक्षण, पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांवर २० वर्षांची निवडणूक बंदी, माध्यम स्वातंत्र्यावरील भूमिका आणि निवडणूक प्रक्रियेत कठोर सुधारणा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.(Cockroach Janta Party)
सेलिब्रिटींचाही पाठिंबा
या मोहिमेला अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेत्री दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा, दिग्दर्शक अनुराग कश्यप, गायक विशाल ददलानी आणि इतर अनेक कलाकारांनी हे पेज फॉलो केल्यामुळे या मोहिमेची लोकप्रियता आणखी वाढली आहे.(Cockroach Janta Party)
‘चळवळ की पक्ष?’; अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया
ही मोहिम पुढे राजकीय पक्षात रूपांतरित होणार का? यावर अभिजीत दीपके यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. “लोकांच्या भावना आणि अपेक्षा समजून घेतल्यानंतरच पुढील दिशा ठरवू,” असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहता ही मोहीम केवळ इंटरनेट ट्रेंड राहणार की प्रत्यक्ष राजकीय चळवळ बनेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Cockroach Janta Party)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.