भारतातील 'हे' शहर आहे जगातील तिसरे सर्वात उष्ण शहर; तापमान ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Total Views |
 
Banda Heatwave
 
पाऊस लागायला अवगे काही दिवस शिल्लक असताना, सध्या देशात उष्णतेचा भडका उडालेला पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बांदा हे शहर भारतातील आणि जगातील सर्वात उष्ण केंद्रांपैकी एक ठरले आहे. २० मे रोजी बांदातील तापमान ४८.४ डिग्री सेल्सिअस इतके रेकॉर्ड करण्यात आले आहे. ज्यामुळे हे शहर जगातील तिसऱ्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत आले. (Banda Heatwave)
 
दरम्यान, बांदापेक्षा जास्त तापमान केवळ इजिप्तमधील अस्वान (४९.४°C) आणि सौदी अरेबियातील अराफात (४९.२°C) येथे नोंदवले गेले. याशिवाय मध्य प्रदेशातील खजुराहो हे ४७.४ डिग्री सेल्सिअस तापमानासह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. बुधवारी २० मे रोजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांतील १६ शहरांमध्ये तापमान ४६°C पेक्षा जास्त राहिले. महाराष्ट्रात वर्धा (४७.१°C), नागपूर (४६.६°C), हरियाणात रोहतक (४६.९°C) आणि मध्य प्रदेशात नौगाव (४६.६°C) येथे उष्णतेचा इतिहास रचला गेला. (Banda Heatwave)
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि थर वाळवंटातून येणारे कोरडे व उष्ण वारे थेट उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात पोहोचत आहेत. यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील किंवा जूनमधील उष्णता आतापासूनच जाणवत आहे. (Banda Heatwave)
 
एम्स दिल्ली येथील प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांच्या मते, सकाळी १० ते दुपारी ३ हे तास उन्हात जाणे टाळा.वृद्ध, लहान मुले आणि आधीपासूनच वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींना या उष्णतेचा सर्वाधिक धोका असतो. तहान लागलेली नसताना किंवा घसा कोरडा पडलेला नसतानाही पाणी पीत राहा. दिवसातून ४ लिटर पाणी प्या. सर्वात उष्ण वेळी जास्त श्रमाची कामे करणे टाळा. सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. (Banda Heatwave)
 
 
Banda Heatwave
 
बांदा इतके उष्ण का आहे? (Banda Heatwave)
 
बांदा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्रज्ञ डॉ. दिनेश यांच्या मते, बांद्याचे कर्कवृत्ताजवळचे भौगोलिक स्थान हे उच्च तापमानाचे मुख्य कारण आहे. इतर घटक म्हणजे थेट सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश, ओलाव्यांची कमतरता, पठारी प्रदेश, कोरड्या नद्या, जंगलतोड आणि खाणकाम. यामुळे उष्णता वाढते. (Banda Heatwave)
 
Banda Heatwave
 
मान्सून एकाच ठिकाणी अडकल्याचे कारण.... (Banda Heatwave)
 
गेल्या तीन दिवसांपासून पाऊस अंदमान आणि निकोबार बेटे आणि कोलंबो या भागांमध्ये अडकला आहे. गुरुवारपासून ईशान्य आणि दक्षिण भारतात आर्द्रता आणि ढग वाढतील. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथे २४ मे पर्यंत पाऊस पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशाच्या उर्वरित भागात प्रचंड उकाडा कायम राहील. (Banda Heatwave)
 
पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज (Banda Heatwave)
 
२२ मे:
 
राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पंजाबमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट.
 
बिहारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट.
 
जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.
 
२३ मे:
 
राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीही उष्ण राहतील.
 
छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही उष्णतेची लाट.
 
आसाम, मेघालय, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com