तुम्ही वापरता ती लिफ्ट सुरक्षित आहे का? वेळीच प्रश्न विचारा अन्यथा होऊ शकते 'या' घटनांची पुनरावृत्ती

Total Views |

मुंबई: (Pune lift accident) पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील रिद्धी सिद्धी अपार्टमेंट्स, निंबाजीनगर येथे लिफ्टमध्ये जवळपास दीड तास अडकून राहिल्याने अवघ्या ७ वर्षांच्या शिवांश शैलेश धूत या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही भीषण घटना मंगळवारी रात्री सुमारे १० वाजेच्या दरम्यान घडली, जेव्हा शिवांश सोसायटीच्या आवारात खेळायला गेला होता आणि त्याने इमारतीच्या लिफ्टमध्ये प्रवेश केला. (Pune lift accident)
 

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवांशने लिफ्टचे बटण दाबल्यानंतर लिफ्ट मध्येच अचानक बंद पडली. त्याच्या घरी तो नेहमीपेक्षा जास्त उशीर झाल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी अपार्टमेंट परिसरात चौकशी सुरू केली. इतर रहिवाशांनीही त्याचा शोध घेतला. सुरुवातीला लिफ्ट तांत्रिक बिघाडामुळे अडकली असावी, असा संशय आला. मात्र रात्री सुमारे ११.३० वाजता स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि सिंहगड रोड पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. लिफ्टचे दरवाजे तोडून बचाव पथकाने आत शिरून शिवांशला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. पण उपचार देऊनही त्याला वाचवता आले नाही. (Pune lift accident)
 

या दुर्घटनेमुळे इमारतीतील लिफ्टची देखभाल व सुरक्षा यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या लिफ्ट दुर्घटनेत एका महिलेसह लहान मुलं जखमी झाली होती; अशा बाबींवरून लिफ्ट व्यवस्थेच्या नियमित तपासणी, तंत्रज्ञानाच्या बदलांची तात्काळ प्रतिक्रिया आणि कायदेशीर नियंत्रण ही भूमिका लक्षात घ्यायला हवी. (Pune lift accident)
 

याच गांभीर्य लक्षात घेऊन, दि. १२ मार्च २०२६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लिफ्ट आणि सरकते जिने यांच्या सुरक्षिततेबाबत युवानेते सत्याजीत तांबे यांच्याकडून काही महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या होत्या. (Pune lift accident)
 

दि. १२ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या प्रमुख सूचना (Pune lift accident)
 
१) विधेयकात लिफ्टचा कार्यकाल २० वर्षे निश्चित करण्यात आला असला, तरी वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात इतका दीर्घ कालावधी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे का, याचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.
 
२) प्रत्येक ४ ते ५ वर्षांनी लिफ्टची सक्तीची तांत्रिक तपासणी करून नव्याने सुरक्षा प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात यावे.
 
३) अनेक स्थानिक कंपन्यांकडून लिफ्टची निर्मिती होत असल्यामुळे त्यांच्या गुणवत्ता, सुरक्षा निकष आणि तांत्रिक मानकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट आणि कठोर SOP असणे गरजेचे आहे.
 
४) लिफ्टची गुणवत्ता, नियमित देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जबाबदारी निश्चित करणाऱ्या अधिक कठोर तरतुदी कायद्यात समाविष्ट करण्यात याव्यात.
 
निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांना इजा होऊ नये, यासाठी सरकारने लिफ्ट सुरक्षा नियमांवर तातडीने कायदेशीर कारवाई आणि नियामक यंत्रणा राबवणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे.


लिफ्ट ही आज केवळ सोय नसून, शहरातील प्रत्येक उंच इमारतीचा जीवनदोर बनली आहे. त्यामुळे तिच्या देखभालीत नफेखोरी किंवा निष्काळजीपणा बरोबर नाही. या दुर्दैवी घटनेनंतर सर्व सोसायटी, इमारत–मालक आणि तपासणी यंत्रणांनी सुरक्षा धोरणात अतिरिक्त सतर्कता आणि वेळेत नियमित तपासणी यावर काटेकोरपणे लक्ष देण्याची वेळ आली आहे. (Pune lift accident)
 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com