मुंबई : (Modi Meloni Melody Gift) पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात इटलीची राजधानी रोम येथे दाखल झाले. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि आत्मीयतेने स्वागत केले. भारत आणि इटली यांच्यातील वाढत्या राजनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.(Modi Meloni Melody Gift)
‘मेलोडी’ टॉफीमुळे चर्चेत आली भेट
या भेटीदरम्यान सर्वाधिक चर्चा रंगली ती एका छोट्याशा पण खास भारतीय गिफ्टची. पंतप्रधान मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील लोकप्रिय ‘मेलोडी’ टॉफी भेट म्हणून दिली. भारतीयांसाठी ही टॉफी आठवणींचा भाग असली तरी, आता ती आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे. मेलोनी यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या गिफ्टबद्दल आनंद व्यक्त केला.(Modi Meloni Melody Gift)
व्हिडिओमध्ये मेलोनी ‘मेलोडी’ टॉफीची चव घेताना दिसतात. त्यांनी हसत या टॉफीचं कौतुक करत ती “खूपच स्वादिष्ट” असल्याचं म्हटलं. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर #Melodi आणि #ModiMeloni हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. अनेक भारतीय यूजर्सनी “मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?” या जुन्या जाहिरातीची आठवणही काढली.(Modi Meloni Melody Gift)
दोन्ही नेत्यांमधील मैत्रीपूर्ण संवादामुळे भारत आणि इटली यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याचं चित्र दिसून आलं. चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी आर्थिक सहकार्य, संरक्षण, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान आणि जागतिक धोरणात्मक भागीदारीवर भर दिला. “भारत आणि इटलीचे संबंध आता केवळ मैत्रीपुरते मर्यादित नसून विशेष रणनीतिक भागीदारीत रूपांतरित झाले आहेत,” असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.(Modi Meloni Melody Gift)
Appena atterrato a Roma, ho avuto l'opportunità di incontrare il Primo Ministro Meloni a cena, seguita da una visita all'iconico Colosseo. Abbiamo scambiato opinioni su una vasta gamma di argomenti. Attendo con interesse i nostri colloqui di oggi, durante i quali proseguiremo la… pic.twitter.com/12yt8UipaJ
यापूर्वी G20 परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमधील संवाद आणि सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता ‘मेलोडी’ टॉफीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘मोदी-मेलोनी’ मैत्री चर्चेचा विषय बनली आहे.(Modi Meloni Melody Gift)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.