US Iran China Sanctions : अमेरिकेची कडक कारवाई! चीनच्या तेल टर्मिनलवर बंदी; इराणसोबत व्यवहार करणाऱ्यांना थेट इशारा...

Total Views |
US Iran China Sanctions
 
मुंबई : (US Iran China Sanctions) जागतिक तेल व्यापार आणि भू-राजकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, युनायटेड स्टेट्सने चीनमधील एका तेल टर्मिनल ऑपरेटरवर निर्बंध लादले आहेत. इराणकडून पेट्रोलियम उत्पादने आयात केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, यासोबतच इतर कंपन्यांनाही स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.(US Iran China Sanctions)
 
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, इराणच्या अवैध तेल व्यापाराला रोखण्यासाठी ही निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत. त्यांच्या मते, या व्यापारातून मिळणारा निधी दहशतवाद आणि प्रादेशिक अस्थिरतेला चालना देतो.(US Iran China Sanctions)
 
या कारवाईत चीनस्थित ‘किंगदाओ हाये’ या पेट्रोलियम टर्मिनल ऑपरेटरला लक्ष्य करण्यात आले आहे. आरोपानुसार, या कंपनीने गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर निर्बंधित इराणी कच्चे तेल आयात केले होते. याशिवाय कंपनीचे अध्यक्ष Xingchun Li यांच्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत.(US Iran China Sanctions)
 
हेही वाचा : Maharashtra HSC Result 2026: दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलीचीच बाजी; कोकण विभाग ९४.१४ टक्कांसह ठरला अव्वल...  
 
फक्त इतकेच नव्हे, तर जहाज व्यवस्थापन क्षेत्रातील दोन कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. थ्राईव्हिंग टाइम्स इंटरनॅशनल आणि ऑनबोर्ड शिप मॅनेजमेंट लिमिटेड या कंपन्यांवर इराणी तेल वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या संशयित जहाजांशी संबंधित कारवायांमुळे निर्बंध लादले गेले. अमेरिकेच्या मते, या जहाजांनी फसव्या पद्धती वापरत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला आहे.(US Iran China Sanctions)
 
दरम्यान, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने सागरी उद्योगालाही स्पष्ट इशारा दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनीमधून सुरक्षित मार्गासाठी इराणला कोणत्याही प्रकारचा ‘टोल’ दिल्यास संबंधित कंपन्यांवरही निर्बंध लागू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.(US Iran China Sanctions)
 
याशिवाय, इराणमधील परकीय चलन व्यवहार सुलभ करणाऱ्या काही संस्थांवरही कारवाई झाली आहे. यात पेद्राम पिरूझन अँड असोसिएट्स पार्टनरशिप कंपनी (ओपल एक्सचेंज), नासेर घासेमी राड अँड असोसिएट्स पार्टनरशिप कंपनी आणि तहाय्योरी अँड असोसिएट्स पार्टनरशिप कंपनी (राडिन एक्सचेंज) यांचा समावेश आहे. या संस्था दरवर्षी अब्जावधी डॉलरच्या व्यवहारांना हातभार लावत असल्याचा आरोप आहे.(US Iran China Sanctions)
 
या नव्या निर्बंधांमुळे जागतिक तेल बाजार, सागरी व्यापार आणि अमेरिका-इराण-चीन संबंधांमध्ये आणखी तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(US Iran China Sanctions)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com