सेल ब्राँडकास्ट अलर्ट म्हणजे नेमके काय?
सेल ब्रॉडकास्ट अलर्ट ही एक प्रगत आपत्कालीन चेतावणी प्रणाली आहे. या माध्यमातून सरकार नैसर्गिक आपत्ती किंवा इतर धोक्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या मोबाईलवर तात्काळ सूचना पाठवू शकते.
ही प्रणाली कसे काम करते?
या प्रणालीद्वारे मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक नागरिकांना संदेश पाठवला जातो. संदेश येताना फोनवर सायरनसारखा आवाज वाजतो आणि स्क्रीनवर अलर्ट दिसतो, ज्यामुळे नागरिकांना त्वरित परिस्थितीची माहिती मिळते.
नागरिकांना काय मेसेज आला?
"भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकतानाही. हा एक चाचणी संदेश आहे - भारत सरकार", असा मेसेज नागरिकांना प्राप्त झाला आहे.
हा संदेश फक्त त्या मोबाईलमध्ये दिसला ज्यामध्ये ‘सेल ब्रॉडकास्ट टेस्ट अलर्ट’ सुरू आहे. वापरकर्ते त्यांच्या मोबाईलमधील Settings > Safety and Emergency > Wireless Emergency Alerts > Test Alerts या पर्यायातून ही सुविधा सुरू करू शकतात. या प्रणालीची चाचणी एकदा पूर्ण झाली की अधिकृतपणे ही प्रणाली सुरू होईल. त्यामुळे भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत सरकार नागरिकांपर्यंत तात्काळ माहिती पोहोचवू शकणार आहे.