मुंबई :(Legislative Council Election) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक तसेच ९ जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने दोन स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
विधानपरिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेच्या पोटनिवडणूकीसाठी मिलींद बोरीकर, भा.प्र.से. यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी मिलींद शंभरकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या १२ मे रोजी विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार असून एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. अशा एकूण १० जागांसाठी १० जणांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....