मुंबई : (Jabalpur Boat Aaccident Viral Photo) मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील बर्गी धरणावर झालेल्या भीषण क्रूझ बोट दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर एक हृदयद्रावक छायाचित्र वेगाने व्हायरल झाले. या फोटोमध्ये एक आई आपल्या लहान मुलाला मिठी मारून शेवटचा श्वास घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या भावनिक कथेमागील सत्य वेगळेच निघाले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा फोटो या दुर्घटनेशी संबंधित नसून तो कदाचित एआय-निर्मित किंवा इतर कोणत्यातरी स्रोतातून घेतलेला आहे.(Jabalpur Boat Aaccident Viral Photo)
जबलपूर जिल्हा प्रशासनाने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे या व्हायरल दाव्याचे खंडन करत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे चुकीचे फोटो आणि माहिती लोकांच्या भावना भडकवू शकतात आणि बचावकार्यावरही परिणाम करू शकतात.(Jabalpur Boat Aaccident Viral Photo)
दरम्यान, ही दुर्घटना गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी सुमारे ६:१५ वाजता घडली. नर्मदा नदीवरील बर्गी धरणाजवळील खमारिया बेट परिसरात सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणारी पर्यटक बोट अचानक खराब हवामानामुळे उलटली. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह खवळला आणि बोटीचा तोल जाऊन ती बुडाली.(Jabalpur Boat Aaccident Viral Photo)
या अपघातात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून २८ जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. काही जण अजूनही बेपत्ता असल्याने शोध आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, पीडितांच्या नातेवाईकांनी निष्काळजीपणाचा आरोप करत बोट जुनी असल्याचे आणि वेळेवर लाईफ जॅकेट्स न दिल्याचे सांगितले आहे.(Jabalpur Boat Aaccident Viral Photo)
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.(Jabalpur Boat Aaccident Viral Photo)
या सर्व प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट होते सोशल मीडियावरील प्रत्येक भावनिक गोष्ट खरी असेलच असे नाही. त्यामुळे अशा संवेदनशील घटनांमध्ये माहितीची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे.(Jabalpur Boat Aaccident Viral Photo)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.