डोंगरीत महाराष्ट्रदिनी ‘विशाल हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

    02-May-2026   
Total Views |
Hindu Conference
 
मुंबई : (Hindu Conference) महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंगरी नगरातील मांडवी वस्तीत दि. १ मे रोजी सकाळी ७ वाजता ‘विशाल हिंदू संमेलन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनात १०८ जोडप्यांच्या उपस्थितीत भव्य नवचंडी महायाग संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन डोंगरी नगर कार्यवाह शुभम फलके यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. संमेलनात मांडवी परिसरातील सुमारे ४०० नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
 
हेही वाचा : Mizoram Peace Deal : मिझोरममध्ये उग्रवादाचा अंत!
 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डोंगरी नगरातील ४० स्वयंसेवक तसेच १५ मातृशक्तींनी सक्रिय सहभाग नोंदविला. मांडवी वस्ती समितीतील कार्यकर्त्यांनीही नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे संचालन श्री स्वामी समर्थ मठ येथील प्रशांत कांदळकर आणि त्यांच्या सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केले. या संमेलनाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे हे संमेलन परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक