Mizoram Peace Deal : मिझोरममध्ये उग्रवादाचा अंत!

हमार पीपल्स कन्व्हेन्शन-डेमोक्रॅटिक’च्या ४३ कार्यकर्त्यांचे शस्त्रसमर्पण

    02-May-2026   
Total Views |
Mizoram Peace Deal
 
मुंबई : (Mizoram Peace Deal) ईशान्य भारतातील मिझोरम राज्यात उग्रवादाचा अंत झाला असून संपूर्ण राज्य आता पूर्णपणे बंडखोरीमुक्त झाले आहे. दि. ३० एप्रिल २०२४ रोजी राज्यातील शेवटच्या सक्रिय बंडखोर गट ‘हमार पीपल्स कन्व्हेन्शन-डेमोक्रॅटिक’च्या ४३ कार्यकर्त्यांनी शस्त्रास्त्रांचा त्याग केला. आइजोलजवळील सेसावंग येथे आयोजित विशेष समारंभात या बंडखोरांनी मुख्य प्रवाहात परतण्याची शपथ घेतली. १४ एप्रिल रोजी मिझोरम सरकार आणि या गटामध्ये झालेल्या शांतता करारानंतर ही महत्त्वपूर्ण यशप्राप्ती झाली आहे.(Mizoram Peace Deal)
 
शस्त्रसमर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली शस्त्रे मुख्यमंत्री लालडुहोमा आणि गृहमंत्री के. सपडांगा यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. हा गट दीर्घकाळ हमार समाजासाठी स्वतंत्र जिल्हा परिषद स्थापनेची मागणी करत होता. आता शस्त्रत्यागानंतर या भागात विकासाचे नवे मार्ग खुले होणार आहेत.(Mizoram Peace Deal)
 
या प्रसंगी माजी आयपीएस अधिकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री लालडुहोमा म्हणाले, “आपण सर्व मिझो आहोत. आपण वेगवेगळे होऊन लढलो, तर कधीच यशस्वी होणार नाही. आपली समान ओळख स्वीकारण्यातच समाधान आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, दशकांपासून सुरू असलेला उग्रवाद आता संपुष्टात आला असून राज्यातील सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन मिझोरमच्या प्रगतीसाठी कार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अशांतता किंवा संघर्ष निर्माण करणाऱ्या कोणत्याही विचारसरणी, धोरण किंवा कृतीला नकार देण्याचे आवाहन केले आणि राज्यात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यास सांगितले.(Mizoram Peace Deal)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक