No PUCC No Fuel: दिल्ली‑NCR मध्ये १ ऑक्टोबरपासून ‘नो पीयुसीसी, नो फ्यूल’ नियम; प्रदूषण प्रमाणपत्र अनिवार्य

Total Views |
 
No PUCC No Fuel
 
दिल्ली: (No PUCC No Fuel) दिल्ली‑NCR परिसरात ‘नो पियुसीसी, नो फ्यूल’ हा नवीन नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. या नियमामुळे ज्या वाहनाला पॉल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUCC) नसेल, त्याला कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही. या निर्णयामागचा हेतू फक्त इंधन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे नसून, दिल्ली आणि आसपासच्या भागातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आहे. (No PUCC No Fuel)
 
दिल्ली‑NCR हा देशातील सर्वात वायु प्रदूषण असलेला भाग आहे. येथे वाहनांच्या धुरामुळे PM2.5 आणि नाईट्रोजन ऑक्साइडसारखे घातक घटक वाढत आहेत. PUCC म्हणजे पॉल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. जे वाहनाच्या धूरातील विषारी घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिले आहे. जे वाहन PUCC च्या टेस्टमध्ये पास होत नाही, त्यातून अनियंत्रित धूर बाहेर पडतो. त्यामुळे अशा वाहनांना इंधन न मिळाल्यास, अशा वाढत्या काळ्या धूराची रेष आपोआपच कमी होणार आहे. (No PUCC No Fuel)
 
हा नियम कसा राबवला जाणार?
 
या नियमानुसार, पेट्रोल पंप चालकांना ऑनलाईन डेटाबेसवरून (प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सिस्टीमद्वारे) वाहनाचा PUCC नंबर तपासून पाहिल्यावरच इंधन देणे अनिवार्य असणार आहे. जर मोटार वाहन संख्या आणि PUCC नंबरचा तपशील जुळत नसेल किंवा PUCC वैध नसेल, तर अशा वाहनांना पंप चालकांना इंधन देण्यास नकार द्यावा लागेल आणि असे न केल्यास पंपधारकांना दंड आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.त्यासोबतच आता या डिजिटल तपासणी व्यवस्थेमुळे चोर मार्गाने PUCC बनवणे किंवा ते बदलणे अत्यंत कठीण होणार आहे. (No PUCC No Fuel)
 
वाहनधारकांनी काय करावे?
 
सर्व वाहनधारकांनी आता आपल्या वाहनाचे PUCC नियमित तपासून ठेवणे गरजेचे आहे. जुनी आणि दर्जेदार पेट्रोल‑डिझेल वाहने, विशेषतः बाईक, कार, टेम्पो, ऑटो यांच्या मालकांनी PUCC नियमित नूतनीकरण करणे आवश्यक आहे. कारण या वाहनांचे वायू प्रदूषण असंतुलित असते. (No PUCC No Fuel)
 
हा नियम लागू झाल्याने काही वेळा छोट्या वाहन मालकांना ताण अनुभवायला लागू शकतो, कारण PUCC दर्शकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या तपासणी आणि वाहनाच्या देखभालीवर खर्च करावा लागतो. (No PUCC No Fuel)
 
दिल्ली‑NCR मधील हा ‘नो पियुसीसी, नो फ्यूल’ हा नियम भविष्यकासाठी त्यासोबतच या परिसरात राहणार्‍या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असाच म्हणावा लागेल. (No PUCC No Fuel)
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com