मुंबई : (Trump Iran War Tension) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौरा संपवून अमेरिकेत परतल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमावरून आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई करू शकते, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य युद्धजन्य परिस्थितीसाठी नवीन आराखडा तयार केल्याची माहिती समोर आली आहे.(Trump Iran War Tension)
‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ पुन्हा सुरू करण्याची तयारी?
अमेरिकन माध्यमांच्या अहवालानुसार, पेंटागॉनमध्ये ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ पुन्हा सक्रिय करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. गेल्या महिन्यात युद्धविराम जाहीर झाल्यानंतर हे अभियान थांबवण्यात आले होते. मात्र आता इराणबरोबरच्या चर्चा अपयशी ठरल्यास नवीन नावाने ही मोहीम पुन्हा सुरू होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लष्करी पर्याय पूर्णपणे खुला ठेवला असून मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हालचाली वाढवल्याची माहिती समोर आली आहे.(Trump Iran War Tension)
इराणचा शांतता प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला
बीजिंगहून परतताना एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी इराणच्या शांतता प्रस्तावावर कठोर भूमिका घेतली. “जर प्रस्तावाची पहिली ओळच मला पटली नसती, तर मी तो लगेच फेकून दिला असता,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका आणि इराणमधील राजनैतिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Trump Iran War Tension)
शी जिनपिंग यांच्यासोबतच्या चर्चेत इराणचा मुद्दा
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीत इराणचा मुद्दाही चर्चेत आला होता. मात्र ट्रम्प यांनी चीनला इराणवर दबाव आणण्याची कोणतीही विनंती केली नसल्याचे सांगितले. चीन हा इराणचा मोठा आर्थिक आणि सामरिक भागीदार मानला जातो. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या तेल आणि वायू पुरवठ्यावर चीन मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे या भागातील अस्थिरतेचा थेट परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.(Trump Iran War Tension)
जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी होर्मुझची सामुद्रधुनी एक मानली जाते. या मार्गातून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते. जर येथे संघर्ष वाढला तर जागतिक तेलपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. त्याचा परिणाम इंधन दर, जागतिक बाजारपेठ आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर होऊ शकतो. याच कारणामुळे अमेरिका, चीन आणि इतर देश या संकटावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.(Trump Iran War Tension)
अमेरिकेची दुहेरी रणनीती; युद्धही आणि संवादही
एका बाजूला अमेरिका संभाव्य लष्करी कारवाईची तयारी करत असताना दुसऱ्या बाजूला राजनैतिक तोडग्याचाही मार्ग खुला ठेवत आहे. ट्रम्प प्रशासनाला हा संघर्ष दीर्घकालीन युद्धात बदलू द्यायचा नाही. अमेरिकन मतदारांसमोर “कठोर पण नियंत्रित” नेतृत्वाची प्रतिमा निर्माण करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी काँग्रेसमध्ये बोलताना “गरज पडल्यास संघर्ष वाढवण्यासाठी आमच्याकडे पूर्ण तयारी आहे,” असे स्पष्ट केले.(Trump Iran War Tension)
मध्यपूर्वेत अमेरिकन सैन्याची मोठी हालचाल
सध्या मध्यपूर्वेत ५० हजारांहून अधिक अमेरिकी सैनिक तैनात आहेत. काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार आणि काही भागात अतिरिक्त लष्करी तयारी असे दोन्ही पर्याय अमेरिकेसमोर आहेत. अमेरिका आणि इस्रायल पुढील आठवड्यात इराणविरोधात संभाव्य नवीन कारवाईसाठी संयुक्त रणनीती आखत असल्याची माहितीही समोर आली आहे. मध्यपूर्वेतील अधिकाऱ्यांनी याला “युद्धविरामानंतरची सर्वात मोठी लष्करी तयारी” असे म्हटले आहे.(Trump Iran War Tension)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.