काळ समोर उभा होता... पण आईच्या मायेपुढे मृत्यूही हरला!

समस्तीपूरच्या शाहपूर पटोरी स्टेशनवर धावत्या ट्रेनखाली झोपून आईने दोन मुलांसह पाच जणांचे प्राण वाचवले

Total Views |
Bihar Train Rescue Incident
 
मुंबई : (Bihar Train Rescue Incident) बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील शाहपूर पटोरी रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. धावती ट्रेन अचानक समोर आल्यानंतर एका आईने अतिशय धाडस आणि प्रसंगावधान दाखवत स्वतःसह आपल्या दोन लहान मुलांचे आणि सोबत असलेल्या दोन महिलांचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक त्या आईच्या धैर्याचे कौतुक करत आहेत.(Bihar Train Rescue Incident)
 
रेल्वे ट्रॅक ओलांडताना अचानक समोर आली ट्रेन
 
मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिला दोन लहान मुलांसह रेल्वे ट्रॅक ओलांडत होत्या. त्याचवेळी अचानक भरधाव ट्रेन समोर आली. काही क्षणांसाठी सर्वजण घाबरून गेले. मात्र, त्यातील एका महिलेने तात्काळ निर्णय घेत सर्वांना ट्रॅकच्या मध्यभागी खाली झोपण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब न करता ती आई दोन्ही मुलांना आपल्या कवेत घेत ट्रॅकवर झोपली. तिच्यासोबत असलेल्या इतरांनीही तसेच केले आणि काही सेकंदांतच ट्रेन त्यांच्या अंगावरून पुढे गेली.(Bihar Train Rescue Incident)
 
श्वास रोखून धरणारा व्हिडिओ व्हायरल
 
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ परिसरातील काही लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला. व्हिडिओमध्ये ट्रेन त्यांच्या अगदी वरून जात असल्याचे दिसते. आजूबाजूचे लोकही भीतीने ओरडताना ऐकू येतात. ट्रेन पुढे गेल्यानंतर स्थानिकांनी धावत जाऊन सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. घटनेत संबंधित आई किरकोळ जखमी झाली असली तरी तिच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.(Bihar Train Rescue Incident)
 
 
 
आईच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक
 
या घटनेनंतर सोशल मीडियावर त्या आईचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेकांनी तिला “खरी हिरो” म्हटले आहे. काही सेकंदांच्या निर्णयामुळे पाच जणांचे प्राण वाचल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना रेल्वे ट्रॅक ओलांडताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Bihar Train Rescue Incident)
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com