“भारत फक्त बदलत नाही, जगात सर्वोत्तम होण्याकडे वाटचाल करतोय” - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाच देशांच्या दौऱ्यात नीदरलँडमध्ये मोदींचं भव्य स्वागत; भारतीय समुदायाच्या योगदानाचं विशेष कौतुक

Total Views |
 
PM Narendra Modi Netherlands Visit
 
मुंबई : (PM Narendra Modi Netherlands Visit) पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईनंतर नेदरलँड्समध्ये दाखल झाले. हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी यांनी उपस्थितांच्या उत्साहाचे कौतुक केले. “इतकं प्रेम आणि उत्साह पाहून काही क्षण मी नीदरलँडमध्ये असल्याचं विसरलो. जणू भारतातच एखादा मोठा उत्सव सुरू आहे, अशी भावना निर्माण झाली,” असे मोदी म्हणाले.(PM Narendra Modi Netherlands Visit)
 
 
 
नीदरलँडच्या प्रगतीत भारतीयांचाही मोठा वाटा
 
भारतीय समुदायाशी संवाद साधताना मोदी यांनी नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. “येथील समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेत भारतीय समुदाय मोठी भूमिका बजावत आहे. प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान वाटतो,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी नेदरलँड्स सरकार आणि येथील नागरिकांचेही आभार मानले आणि १४० कोटी भारतीयांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.(PM Narendra Modi Netherlands Visit)
 
 
 
परदेशात राहूनही भारतीय संस्कृती जिवंत
 
मोदी यांनी भारतीय प्रवासी कुटुंबांच्या संघर्ष आणि यशोगाथांचा उल्लेख करताना भारतीय संस्कृतीचे कौतुक केले. “पिढ्या बदलल्या, देश बदलले, पण संस्कार बदलले नाहीत. तुम्ही डच भाषा स्वीकारली, पण आपल्या मातृभाषा आणि परंपरा सोडल्या नाहीत,” असे ते म्हणाले. भारतीय कम्युनिटी रेडिओ आणि संगीतामुळे भारतीय संस्कृती डच समाजापर्यंत पोहोचत असल्याचेही त्यांनी नमूद केले.(PM Narendra Modi Netherlands Visit)
 
हेही वाचा : मध्यपूर्वेत महासंकटाची चाहूल? अमेरिका-इराण संघर्षाचे ढग गडद!
 
२०१४ च्या विजयाची आठवण
 
१६ मे या तारखेचं महत्त्व सांगताना मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली. “आजपासून १२ वर्षांपूर्वी याच दिवशी भारतात स्थिर आणि पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं होतं,” असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि पंतप्रधान म्हणून १२ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. “हा फक्त आकडा नाही, तर जनतेचा आशीर्वाद आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.(PM Narendra Modi Netherlands Visit)
 
 
 
‘तुमचं कल्याण हेच माझं कर्तव्य’
 
स्वतःच्या जीवनप्रवासाबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, लहानपणापासूनच ते देशभक्तीच्या विचारांनी प्रेरित झाले. “मी ‘अहम’ऐवजी ‘वयम्’चा मार्ग निवडला. त्यामुळे जनतेचं सुख हेच माझं सुख आणि तुमचं कल्याण हेच माझं कर्तव्य बनलं,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.(PM Narendra Modi Netherlands Visit)
 
 
 
‘भारत आता फक्त बदल नाही, सर्वोत्तम बनण्याचं स्वप्न पाहतो’
 
आपल्या भाषणाच्या शेवटी मोदी यांनी नव्या भारताच्या आकांक्षांवर भर दिला. “आज भारत फक्त परिवर्तनाची नाही, तर जगातील सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान राष्ट्र बनण्याची स्वप्नं पाहतो आहे. त्यामुळे देशात अमर्याद आकांक्षा आणि तितकेच मोठे प्रयत्न सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.(PM Narendra Modi Netherlands Visit)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com