लखनऊ (Mulayam Singh Yadav’s Son Prateek Yadav Dies After Two Heart Attacks) : तेरा दिवसांत दोन वेळा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारादरम्यान मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. ३० एप्रिल रोजी लखनऊच्या चौधरी चरण सिंह विमानतळावर विमानातून उतरून व्हीआयपी लाउंजकडे जात असताना प्रतीक यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले.
त्यावेळी अपर्णा यादवही रुग्णालयात पोहोचल्या होत्या. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आणि झटका सौम्य असल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, १३ मे रोजी त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सकाळी ६.३० वाजता त्यांना सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता. त्यामुळे डॉक्टरांना फारसे प्रयत्न करता आले नाहीत. प्रतीक यांना शेवटचे पाहताना अखिलेश यादव भावूक झाले. ते म्हणाले, "तो स्वतःच्या तब्येतीची खूप काळजी घ्यायचा. मीही त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले होते." (Mulayam Singh Yadav’s Son Prateek Yadav Dies After Two Heart Attacks)
#WATCH | Lucknow: Uttar Pradesh Deputy CM Brajesh Pathak says, "This is a very sorrowful moment. Prateek Yadav has left us untimely. I pray to God to grant him a place at His holy feet. May He give strength to the entire family to bear this unbearable pain." pic.twitter.com/QHqdLrNLtj
३० एप्रिलच्या झटक्यानंतर प्रकृतीत सुधारणा होताच प्रतीक यांनी रुग्णालयातून डिस्चार्जची मागणी केली होती. मात्र डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मेदांता रुग्णालयातील डॉ. रुचिका शर्मा यांनी प्रतीक यांना उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉटिंग) असल्याचे निदान केले होते. तरीही ३ मे रोजी त्यांनी अचानक रुग्णालय सोडले.
प्रतीक यादव यांच्या पायात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘डीप व्हेन थ्रोम्बोसिस’ असे म्हणतात. ५ मे रोजी लखनऊतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ६ मे रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी परतले. त्यानंतर ते बहुतांश वेळ आपल्या खोलीतच राहत होते आणि फार कमी लोकांना भेटत होते. आसाम दौऱ्यावर असलेल्या अपर्णा यादव या फोनवरून त्यांच्या प्रकृतीची सातत्याने चौकशी करत होत्या.
कसं होतं कौटुंबिक जीवन?
प्रतीक यादव यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से समाजवादी पक्षाच्या समर्थकांमध्ये चर्चिले जात आहेत. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलायम सिंह यादव यांची इच्छा होती की प्रतीक यांनी निवडणूक लढवून राजकारणात यावे. सपा समर्थकांनाही त्यांच्यात भविष्यातील नेतृत्व दिसत होते.
प्रतीक हे मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांच्या पहिल्या पती चंद्र प्रकाश यांचे पुत्र होते. त्यामुळे यादव कुटुंबात अशी भीती होती की प्रतीक यांच्या राजकीय प्रवेशामुळे अखिलेश यादव यांच्यावर परिणाम होऊ शकतो. अखिलेश यांनाच राजकीय वारसदार मानावे, अशी भूमिका होती. मुलायम सिंह यादव यांनीही कुटुंबाला आश्वस्त केले होते की अखिलेश यांच्याबाबत कोणताही भेदभाव होणार नाही. (Mulayam Singh Yadav’s Son Prateek Yadav Dies After Two Heart Attacks)
विशेष म्हणजे अखिलेश यादव यांचीही इच्छा होती की, प्रतीक यांनी राजकारणात यावे. यासाठी ते अनेकदा त्यांना राजकीय घडामोडी समजावून सांगत आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी ओळख करून देत होते. मात्र, "मी राजकारणात येणार नाही," असे सांगत प्रतीक यांनी अनेकदा राजकीय वाटचालीस नकार दिला.
४ जुलै १९८६ रोजी जन्मलेल्या प्रतीक यांच्या वडिलांपासून त्यांची आई साधना गुप्ता यांचा घटस्फोट झाला, तेव्हा ते अवघे चार वर्षांचे होते. त्यानंतर ते आईसोबत लखनऊमध्ये राहत होते. साधना गुप्ता या सैफई येथील एका रुग्णालयात कार्यरत होत्या. त्याच काळात त्यांचा मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबाशी संपर्क आला. घटस्फोटानंतर साधना आणि मुलायम सिंह एकमेकांच्या अधिक जवळ आले.
त्या काळात मुलायम सिंह यांच्या पहिल्या पत्नी मालती देवी आणि अखिलेश यादव हे मुख्यमंत्री निवासस्थानी राहत होते. साधना आणि प्रतीक यांचेही तेथे येणे-जाणे होते. प्रतीक अनेकदा तेथे राहत असत. त्यांनी त्यासंबंधीचे काही फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले होते. (Mulayam Singh Yadav’s Son Prateek Yadav Dies After Two Heart Attacks)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.