तेल अवीव / तेहरान / वॉशिंग्टन डीसी (Another ship from Gujarat has sunk in the Strait of Hormuz) : अमेरिका विरूध्द इराण संघर्षाच्या (Iran– America War)पार्श्वभूमीवर गुजरातला येणाऱ्या आणखी एका मालवाहू जहाजावर इराणतर्फे हल्ला करण्यात आला. ‘हाजी अली’ नावाचे हे जहाज होर्मुझच्या समुद्रमार्गे (Strait of Hormuz) प्रवास करताना संशयित क्षेपणास्त्राच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरले. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागून ते अखेर समुद्रात बुडाले.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी पहाटे हे जहाज ओमानच्या सागरी हद्दीतून जात होते. जहाजाचे मालक आणि गुजरातच्या द्वारका येथील रहिवासी ‘सुलतान अहमद अन्सार’ यांनी सांगितले की, “एमएसव्ही हाजी अली हे जहाज बेरबेरा बंदरातून शारजाच्या दिशेने निघाले होते. पहाटे सुमारे ३:३० वाजता ओमानच्या किनाऱ्याजवळ जहाजावर मोठा स्फोट झाल्याचा आवाज कर्मचाऱ्यांनी ऐकला. त्यानंतर काही क्षणांतच जहाजाला आग लागली आणि परिस्थिती गंभीर बनली”.
🇮🇳 NEW—India has lodged a condemnation after an Indian vessel reportedly sank following an Iranian drone strike in the Strait of Hormuz.
New Delhi condemned the targeting of civilian shipping and warned that international trade routes cannot be controlled or dictated by any one… pic.twitter.com/TkRCdI0xsO
संकट ओळखून जहाजावरील सर्व १४ कर्मचाऱ्यांनी तातडीने लाईफबोट्सच्या सहाय्याने जहाज सोडले. ओमान तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य राबवत सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. (Another ship from Gujarat has sunk in the Strait of Hormuz)
यापूर्वी ७ मे रोजी गुजरातमधील (Gujarat Cargo Ship)‘एमएसव्ही अल फैज नूरे सोलेमानी-१’ या जहाजालाही होर्मुझ समुद्रमार्गावर (Strait of Hormuz) गोळीबाराचा सामना करावा लागला होता. या सलग घटनांमुळे या महत्त्वाच्या समुद्री मार्गाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग अशा हल्ल्यांच्या विळख्यात सापडत असेल, तर त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेवरही होऊ शकतात. त्यामुळे या भागातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.(Another ship from Gujarat has sunk in the Strait of Hormuz)
गेल्या ४८ तासांत नेमकं काय घडलं?
तेहरानमध्ये युद्धामुळे प्रभावित ८० टक्के भागाची डागडुजी : तेहरानमध्ये युद्धामुळे झालेल्या नुकसानीची डागडुजी करण्यात इराणला यश आले आहे. युद्धात एकूण ६० हजारांहून अधिक निवासी इमारतींचे नुकसान झाले होकते.
युरोपात विमान इंधनाची टंचाई : आयईएच्या मते, मार्चमध्ये युरोपला जवळपास ३.३ लाख बॅरल जेट फ्यूल मिळत होते. आता एप्रिलमध्ये हा आकडा केवळ ६० हजार बॅरलवर घसरला आहे.
लेबनानमध्ये मृतांचा आकडा २८९६ वर : लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांच्या मते, एकूण मृतांची संख्या २ हजार ८९६ वर पोहोचली आहे. यात २०० मुलांचा सामावेश आहे.
अमेरिकेतर्फे इनाम जारी : अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने ईराणी रिव्होल्यूशन गार्ड्सच्या वित्तीय यंत्रणांची माहिती देणाऱ्यांना १५ दशलक्ष डॉलर्स इतका इनाम जारी केला आहे.
सौदी अरबतर्फे इराणवर गुप्त हल्ले : रॉयटर्स या वृत्तसंस्थेने इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार सौदी अरबतर्फे इराणवर गुप्त हल्ले झाल्याचा दावा करण्यात आला आहे.(Another ship from Gujarat has sunk in the Strait of Hormuz)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.