७ मिनिटांत कॅन्सरवर उपचार! भारतात लॉन्च झालं फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी नवं इम्युनोथेरपी इंजेक्शन

Total Views |
Immunotherapy Injection
 
मुंबई : (Immunotherapy Injection) कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारांमध्ये वेळ, खर्च आणि उपचार पद्धती या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. अशातच भारतात फुफ्फुसाच्या कॅन्सरवरील नवीन इम्युनोथेरपी इंजेक्शन लॉन्च करण्यात आलं असून, हे उपचार क्षेत्रासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे. या नव्या उपचारपद्धतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे इंजेक्शन अवघ्या ७ मिनिटांत दिलं जाऊ शकतं. याआधी हीच औषधं रुग्णांना IV इन्फ्युजनद्वारे दिली जात होती, ज्यासाठी अनेक तास रुग्णालयात थांबावं लागत होतं.(Immunotherapy Injection)
 
कोणत्या प्रकारच्या कॅन्सर रुग्णांसाठी हे इंजेक्शन?
 
ही नवीन इम्युनोथेरपी मुख्यतः नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) असलेल्या रुग्णांसाठी तयार करण्यात आली आहे. भारतात दरवर्षी हजारो नवीन फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण आढळतात आणि त्यामध्ये NSCLC हा प्रकार सर्वाधिक आढळणारा आहे. मात्र, प्रत्येक रुग्णासाठी ही थेरपी उपयुक्त असेलच असं नाही. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ज्या रुग्णांच्या कॅन्सर सेल्समध्ये PD-L1 प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्यांनाच या उपचाराचा जास्त फायदा होऊ शकतो. अंदाजे NSCLC असलेल्या जवळपास निम्म्या रुग्णांमध्ये हा प्रोटीन उच्च प्रमाणात आढळतो.(Immunotherapy Injection)
 
इम्युनोथेरपी नेमकी काम कशी करते?
 
मानवी शरीरातील T-सेल्स हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा महत्त्वाचा भाग असतात. हे सेल्स शरीरातील हानिकारक किंवा असामान्य पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करतात. मात्र अनेक कॅन्सर सेल्स त्यांच्या बाहेरील भागावर PD-L1 नावाचं प्रोटीन तयार करतात. हे प्रोटीन T-सेल्सना गोंधळात टाकतं आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कॅन्सरवर योग्य प्रकारे हल्ला करू शकत नाही. या नव्या इंजेक्शनमध्ये वापरण्यात आलेलं Atezolizumab हे औषध PD-L1 प्रोटीनला ब्लॉक करतं. त्यामुळे शरीरातील T-सेल्स पुन्हा सक्रिय होतात आणि कॅन्सर पेशींना ओळखून त्यांच्यावर हल्ला करण्यास सक्षम होतात.(Immunotherapy Injection)
 
७ मिनिटांत उपचार; रुग्णांसाठी मोठा दिलासा
 
याआधी ही थेरपी IV इन्फ्युजनच्या स्वरूपात दिली जात होती. त्यामुळे रुग्णांना अनेक तास रुग्णालयात राहावं लागायचं. मात्र आता नवीन Subcutaneous (SC) Injection पद्धतीमुळे हे इंजेक्शन थेट मांडीमध्ये फक्त ७ मिनिटांत देता येणार आहे. या नव्या पद्धतीमुळे रुग्णालयांवरील ताणही कमी होणार आहे. ज्या वेळेत एका रुग्णाला IV उपचार दिले जात होते, त्याच वेळेत आता अनेक रुग्णांना SC इंजेक्शन देता येणार आहे. त्यामुळे उपचार प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.(Immunotherapy Injection)
 
रुग्णांना नवीन पद्धत अधिक पसंत
 
जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासांमध्ये बहुतेक रुग्णांनी IV उपचारांपेक्षा SC इंजेक्शन पद्धतीला प्राधान्य दिलं आहे. कारण या प्रक्रियेमध्ये कमी वेळ लागतो, वेदना तुलनेने कमी होतात आणि रुग्णांना वारंवार रुग्णालयात तासंतास थांबण्याची गरज राहत नाही. विशेषज्ञांच्या मते, उपचारांचा मानसिक ताण कमी करण्यासाठीही ही पद्धत उपयुक्त ठरू शकते.(Immunotherapy Injection)
 
या इंजेक्शनची किंमत किती?
 
भारतामध्ये लॉन्च झालेल्या या नव्या इम्युनोथेरपी इंजेक्शनची किंमत मात्र सामान्य रुग्णांसाठी मोठं आव्हान ठरू शकते. एका डोसची किंमत अंदाजे ३.७ लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. साधारणपणे एका रुग्णाला उपचारासाठी ६ डोसची आवश्यकता लागू शकते. म्हणजेच पूर्ण उपचाराचा खर्च लाखोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र काही कंपन्यांकडून सुरू करण्यात आलेल्या Patient Assistance Program मुळे पात्र रुग्णांना आर्थिक मदत मिळू शकते.(Immunotherapy Injection)
 
CGHS अंतर्गतही समावेश
 
ही नवीन थेरपी आता CGHS (Central Government Health Scheme) अंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या काही रुग्णांना उपचार खर्चात दिलासा मिळू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भविष्यात अशा आधुनिक उपचारपद्धती अधिक उपलब्ध झाल्यास भारतातील कॅन्सर उपचार व्यवस्थेमध्ये मोठा बदल होऊ शकतो.(Immunotherapy Injection)
 
भारतातील कॅन्सर उपचारासाठी महत्त्वाचं पाऊल
 
फुफ्फुसाच्या कॅन्सरवरील या नवीन इम्युनोथेरपी इंजेक्शनमुळे रुग्णांना कमी वेळेत अधिक प्रभावी उपचार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जरी उपचार खर्च मोठा असला तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॅन्सर उपचार अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.(Immunotherapy Injection)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com