“आँटी चोर! भाँजा चोर!”, ममतांविरोधात घोषणाबाजी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Total Views |

mumbai tarun bharast
 
कोलकत्ता (Mamata Banerjee Appears Before Calcutta High Court) : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निकालांनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी कोर्टासमोर हजर झाल्या. स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा वकिली गणवेश परिधान करत त्या दि. १४ मे रोजी कोलकत्ता उच्च न्यायालयात (Kolkata High Court) पोहोचल्या. मुख्य न्यायमुर्ती सुजॉय पाल व न्या. पार्थसारथी सेन यांच्यासमोर त्यांची सुनावणी पार पडली. दरम्यान ही याचिका भाजप समर्थकांच्या हत्यांच्या प्रश्नावर दाखल करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना यावेळी पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न झाला.
 
सुनावणीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाला सांगितले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात बुलडोझर कारवाईसह मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आहे. पोलीस एफआयआर दाखल करण्याची परवानगी देत नाहीत. त्यांनी तृणमुल कार्यकर्त्यांवर हल्ले, जाळपोळ आणि हत्या केल्याचा आरोप केला आणि न्यायालयाकडून सुरक्षा व निष्पक्ष चौकशीची मागणी केली. दरम्यान, सुनावणीनंतर जेव्हा ममता बॅनर्जी कोर्टरूममधून बाहेर आल्या, तेव्हा कॉरिडॉरमध्ये वकिलांचा जमाव जमला आणि त्यांनी 'आंटी चोर, भाचा चोर' असे म्हणत जमावाने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
बार कौन्सिलने मागविल्या सनदीच्या नोंदी
 
भारतीय बार कौन्सिलने (बीसीआय) पश्चिम बंगाल बार कौन्सिलला पत्र लिहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नोंदणी आणि वकिलीच्या नोंदी मागितल्या आहेत. नोंदणी, वकिलीवरील बंदी आणि वकिली प्रमाणपत्रासंबंधीची माहिती दोन दिवसांच्या आत द्यावी, अशी विनंती बीसीआयने केली आहे. फेब्रुवारीमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रकरणाची सुनावणी घेतली, जिथे बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपला युक्तिवाद सादर केला. ममता बॅनर्जी न्यायालयात १३ मिनिटे आपली बाजू मांडत होत्या. खंडपीठासमोर हात जोडून उभ्या राहून त्या म्हणाल्या, "आम्हाला कुठेच न्याय मिळत नाहीये."(Mamata Banerjee Appears Before Calcutta High Court)
 
राजकारणामुळे लागला वकिलीला ब्रेक
 
ममता यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, १९७९ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून एमए पूर्ण केल्यानंतर, त्यांनी जोगेश चंद्र चौधरी कॉलेज (कोलकाता) येथे एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यांनी १९८२ मध्ये एलएलबी पूर्ण केले. ममता यांनी १९८० च्या दशकात कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली केली. ही कारकीर्द फार काळ टिकली नाही, कारण याच काळात त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. ममता फार पूर्वीपासून वकिली करत नाहीत. त्या कायद्याच्या पदवीधर असून त्यांना न्यायालयीन कार्यपद्धती आणि घटनात्मक प्रक्रियांची जाण आहे.
 
 
२०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका सर्वाधिक हिंसक ठरल्या,(Bengal violence case) ज्यात हिंसाचाराच्या तिनशे घटना आणि ५८ मृत्यू झाले. भाजपचा दावा आहे की, गेल्या काही वर्षांत ते आत्तापर्यंत त्यांचे चारशेहून अधिक कार्यकर्ते मारले गेले आहेत. तृणमुल काँग्रेसविरोधात हिंसाचाराच्या दोन हजारहून अधिक तक्रारी मिळाल्या असूनही, एकही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. त्यांच्या पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची हत्याही झाली आहे.(Mamata Banerjee Appears Before Calcutta High Court)
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com