मुंबई : (Delhi Gangrape Case) देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेमुळे चर्चेत आली आहे. राणी बाग परिसरात एका ३० वर्षीय महिलेला खासगी बसमध्ये जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर तब्बल दोन तास सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना व्यक्त होत आहे.(Delhi Gangrape Case)
वेळ विचारणं ठरलं जीवघेणं
पीडित महिला मंगोलपुरी परिसरातील एका फॅक्टरीमध्ये काम करते. सोमवारी रात्री काम संपल्यानंतर ती नेहमीप्रमाणे पायी घरी परतत होती. रात्री उशिराची वेळ असल्याने सरस्वती विहार बस स्टँडजवळ उभ्या असलेल्या एका खासगी स्लीपर बसजवळ ती थांबली. बसच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तिने केवळ वेळ विचारली. मात्र, याच क्षणापासून तिच्यासोबत भीषण घटना घडली. महिलेच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये उपस्थित असलेल्या दोन व्यक्तींनी तिला जबरदस्तीने आत खेचलं आणि बसचा दरवाजा बंद करून चालकाला गाडी पुढे नेण्यास सांगितलं.(Delhi Gangrape Case)
दोन तास चालला अमानुष अत्याचार
महिलेच्या जबाबानुसार, राणी बाग ते नांगलोई या मार्गावर चालत्या बसमध्ये दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जवळपास दोन तास आरोपी तिच्यावर अत्याचार करत होते. महिला मदतीसाठी आरडाओरडा करत होती, मात्र सुनसान रस्ते आणि बंद बसमुळे तिचा आवाज कुणापर्यंत पोहोचू शकला नाही. अत्याचारानंतर आरोपींनी महिलेला गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि घटनास्थळावरून फरार झाले.(Delhi Gangrape Case)
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर संशयित बसची ओळख पटली. काही तासांतच पोलिसांनी बस चालक आणि कंडक्टरला अटक केली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली बसही जप्त करण्यात आली आहे.
पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून बलात्कार झाल्याची पुष्टी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Delhi Gangrape Case)
Nirbhaya Again 🚨 Delhi, woman gang-raped inside a bus.
While returning home from factory, driver and conductor of a sleeper bus pulled her inside and raped her. Around 2 am, the perpetrators dropped her on the road and fled.
पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. एका सामान्य कष्टकरी महिलेसोबत अशा प्रकारे घडलेली ही घटना समाजमन हादरवणारी ठरत आहे. विशेषतः खासगी बस आणि सार्वजनिक वाहतुकीमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिक, महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या दाव्यांवरही आता पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.(Delhi Gangrape Case)
‘निर्भया’ प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या
या घटनेमुळे २०१२ मधील निर्भया प्रकरणाच्या वेदनादायक आठवणी पुन्हा समोर आल्या आहेत. चालत्या बसमध्ये घडलेला हा प्रकार दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारा मानला जात आहे. नागरिकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.(Delhi Gangrape Case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.