"वर्षभर सोनं खरेदी करू नका!", मोदींच्या आवाहनानंतर आयात शुल्क १५ टक्के! जाणून घ्या सोन्याचे दर किती?

Total Views |
Details of the Gold Duty Hike
 
मुंबई : (Details of the Gold Duty Hike) जागतिक आर्थिक अस्थिरता, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि परकीय चलनावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. सोने आणि चांदीच्या आयातीवर लागणारे शुल्क (Import Duty) ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.(Details of the Gold Duty Hike)
 
बुधवारी जारी करण्यात आलेल्या या आदेशानंतर सराफा बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. १३ मे रोजी १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत तब्बल ९ हजार रुपयांची वाढ झाली, तर चांदी २२ हजार रुपयांनी महागली. सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर सुमारे १.६० लाख रुपयांवर पोहोचला असून, १ किलो चांदीचा भाव २.८७ लाख रुपयांवर गेला आहे.(Details of the Gold Duty Hike)
 
केंद्र सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला?
 
केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर लागू असलेले शुल्क ६% वरून १५% पर्यंत वाढवले आहे.
 
या नव्या रचनेनुसार:
१०% बेसिक कस्टम ड्युटी व ५% Agriculture Infrastructure and Development Cess (AIDC) असा एकूण १५% प्रभावी कर लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २०२४ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे शुल्क १५% वरून कमी करून ६% केले होते. (New Tax Structure) मात्र आता पुन्हा शुल्क वाढवण्यात आले आहे. (Details of the Gold Duty Hike)
 
अमेरिकन-इराण संघर्षाचा मोठा परिणाम
 
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतातून मोठ्या प्रमाणात डॉलर बाहेर जात असल्याने सरकारवर परकीय चलनसाठा सुरक्षित ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याच कारणामुळे सरकारने सोने-चांदी आयात महाग करून विदेशी खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. (Details of the Gold Duty Hike)
 
 
 
एका दिवसात सोनं-चांदीत विक्रमी वाढ
 
नवीन शुल्क लागू झाल्यानंतर सराफा बाजारात मोठी वाढ झाली. सोनं तब्बल ९ हजार रुपयांनी महागलं तर चांदी २२ हजार रुपयांनी वाढली.यामुळे गुंतवणूकदार, व्यापारी आणि सामान्य ग्राहकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Details of the Gold Duty Hike)
 
भारताला सोने आयात का करावं लागतं?
 
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने विदेशातून आयात करावे लागते. या आयातीसाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. जेव्हा आयात वाढते, तेव्हा देशातून अधिक परकीय चलन बाहेर जाते आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. सरकारचे म्हणणे आहे की, आयात कमी केल्यास परकीय चलनसाठ्यावरचा दबाव कमी होईल. (Details of the Gold Duty Hike)
 
IGST नियम बदलल्यानंतर बँकांची अडचण
 
सरकारने नुकतेच सोने-चांदीवरील ३% IGST संदर्भातील नियमांमध्ये बदल केले होते. नव्या नियमांनुसार बँकांना सोने आयात करताच तत्काळ IGST भरावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा अडकू लागला आहे. पूर्वी ‘Bonded Warehouse’ सुविधेमुळे सोने विकले गेल्यानंतर कर भरावा लागत होता. मात्र आता आयात होताच कर भरावा लागत असल्याने बँकांच्या कॅश फ्लोवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेक बँकांनी गेल्या महिनाभरापासून सोने आयातच थांबवल्याची माहिती समोर आली आहे. (Details of the Gold Duty Hike)
 
एप्रिलमधील सोन्याची आयात ३० वर्षांतील सर्वात कमी
 
बँकांनी आयात कमी केल्यामुळे एप्रिल महिन्यात भारताची सोन्याची आयात केवळ १५ टनांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोविड काळ वगळता, गेल्या तीन दशकांतील कोणत्याही महिन्यातील ही सर्वात कमी आयात मानली जात आहे. (Details of the Gold Duty Hike)
 
तस्करी वाढण्याची भीती
 
सराफा उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आयात शुल्क वाढवल्यामुळे पुन्हा एकदा सोन्याची तस्करी वाढू शकते. पूर्वी शुल्क कमी करण्यात आल्यानंतर स्मगलिंगमध्ये घट झाली होती. आता शुल्क वाढल्याने बेकायदेशीर मार्गाने सोने आणण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Details of the Gold Duty Hike)
 
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची प्रतिक्रिया
 
India Bullion and Jewellers Association चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, चालू खात्यातील तूट (Current Account Deficit) नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, आधीच वाढलेल्या किंमतींच्या काळात हा निर्णय सोन्याच्या मागणीवर परिणाम करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार?
 
१.सोनं अधिक महाग होणार
कर वाढल्यामुळे भारतात पोहोचणाऱ्या सोन्याची किंमत वाढेल. परिणामी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील.
 
२. बाजारात पुरवठा कमी होऊ शकतो
उच्च कर आणि वाढलेल्या किंमतींमुळे व्यापारी कमी प्रमाणात सोने आयात करतील. त्यामुळे बाजारातील उपलब्धता घटू शकते.
 
३. लग्नसराई आणि दागिने बाजारावर परिणाम
भारतात लग्नसराईत सोन्याची मोठी खरेदी होते. वाढलेल्या किंमतींमुळे दागिने बाजारात मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
 
सरकारच्या मते, या निर्णयामुळे व्यापार तूट कमी होण्यास मदत होईल, डॉलरवरील दबाव कमी होईल, रुपयाला स्थैर्य मिळू शकते व परकीय चलनसाठा सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे, १२ मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.५० या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला होता.
 
पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन
 
नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस देशवासियांना एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं. मोदी म्हणाले होते, “एक काळ असा होता जेव्हा लोक देशहितासाठी सोनं दान करत होते. आज दानाची गरज नाही, पण देशहितासाठी एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचा संकल्प करायला हवा.” त्यांनी विदेशी चलन बचतीसाठी स्वदेशी स्वीकारण्यावर भर दिला होता.
 
सरकारचा उद्देश काय?
 
सरकारचा मुख्य उद्देश परकीय चलनाची बचत करणे, आयात खर्च कमी करणे, चालू खात्यातील तूट नियंत्रणात ठेवणे, रुपयाला आधार देणे, जागतिक आर्थिक संकटात अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे असा असल्याचे मानले जात आहे. (Details of the Gold Duty Hike)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com