Baramati plane crash: बारामतीत पुन्हा विमान अपघात; आपत्कालीन लँडिंगदरम्यान विजेच्या खांबाला धडकून विमान कोसळले! नेमकं काय घडलं?

Total Views |


 
Baramati plane crash

बारामती: (Baramati plane crash) बारामतीस्थित रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीचे प्रशिक्षण विमान बुधवार, दि. १३ मे रोजी सकाळी सुमारे ८.५० वाजता बारामती विमानतळाजवळ आपत्कालीन लँडिंग करताना अपघातग्रस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कमी उंचीवर उड्डाण करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमानाने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. (Baramati plane crash)
 
या लँडिंगदरम्यान विमानाचा विजेच्या खांबाला धक्का लागला. त्यानंतर विमान गोजुबावी गावाजवळ जमिनीवर कोसळले. दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक किरकोळ जखमी झाला असून तो सध्या सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक प्रशासन आणि विमानन अधिकाऱ्यांनी दिली. विमानाचे तुकडे गोजुबावी गावाजवळच्या शेतात आढळून आले असून, चौकशीसाठी डीजीसीए आणि इतर संबंधित यंत्रणांनी तातडीने टीम पाठव आहे. (Baramati plane crash)

बारामती विमान अपघाताबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल म्हणाले, "ही घटना आज सकाळी सुमारे ८:५० वाजता घडली. रेड बर्ड एव्हिएशनचे एक प्रशिक्षण विमान बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावात कोसळले. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमान कमी उंचीवर उडत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. अपघातादरम्यान, विमानाचा एक भाग जमिनीवर आदळण्यापूर्वी एका विजेच्या खांबाला धडकला. विमानात केवळ एक प्रशिक्षणार्थी पायलट होता. सुदैवाने, पायलटला गंभीर दुखापत झाली नाही आणि तो सुरक्षित आहे. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक तपास आणि पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे." (Baramati plane crash)



या गोजुबावी गावाजवळ ऑक्टोबर २०२३ मध्ये आधीही एक ट्रेनिंग एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झाले होते, त्यानंतर तीन वर्षांनी २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे विमान आणि आता १३ मे २०२६ रोजी आणखी एक विमान याच भागात कोसळल्यामुळे गोजुबावी हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. गोजुबावी हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कृषीप्रधान गाव असून, पुण्यापासून सुमारे १०० किमी आणि बारामतीपासून १० किमी अंतरावर वसलेले असल्याने येथील वारंवार विमान अपघातानंतर विमानतळ सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या नव्या अपघातानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणांवर निरीक्षण आणि तांत्रिक तपासणी अधिक कडकपणे केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Baramati plane crash)
 

 





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com