PM Narendra Modi Economic Appeals : “आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन; पेट्रोलपासून सोन्यापर्यंत ‘हे’ खर्च तात्काळ कमी करा!”
मुंबई : (PM Narendra Modi Economic Appeals) देशासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्त्वाच्या सूचना करत संसाधनांचा संयमाने वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाढती इंधनदरवाढ, परकीय चलनाचा ताण आणि जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(PM Narendra Modi Economic Appeals)
दुनियाभर में आज जो चुनौतियां आई हैं, हमें उन्हें परास्त करना होगा। विदेशी मुद्रा बचाने के लिए जो भी रास्ते अपना सकते हैं, हमें उन्हें अपनाना होगा। pic.twitter.com/vyNUQNzFLF
पंतप्रधानांनी सर्वप्रथम पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचे आवाहन केले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशावर आर्थिक ताण वाढत असल्याने इंधन बचत करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.(PM Narendra Modi Economic Appeals)
खाद्यतेलाचा वापर मर्यादित करणे
त्याचबरोबर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने देशांतर्गत बचत आणि स्वावलंबनावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.(PM Narendra Modi Economic Appeals)
वैश्विक संकट के इस समय में हमें कर्तव्यों को सर्वोपरि रखते हुए कुछ संकल्प लेने होंगे और उन्हें पूरा करना ही होगा। इसे लेकर मेरा यह विशेष आग्रह… pic.twitter.com/9XvcczYdyl
पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलनावर ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले.(PM Narendra Modi Economic Appeals)
विदेशी प्रवास नियंत्रणात आणावा
विदेश प्रवास शक्यतो टाळावा, असेही त्यांनी सांगितले. परदेश दौऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते, त्यामुळे आवश्यकतेशिवाय विदेश प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(PM Narendra Modi Economic Appeals)
कच्च्या तेलाची बचत करण्यावर भर देत त्यांनी नागरिकांना पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला. “जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा आणि शक्य असल्यास इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा,” असे आवाहन त्यांनी केले.(PM Narendra Modi Economic Appeals)
भारत के हर कोने में राजनीतिक मानस में आया परिवर्तन इस बात का संकेत है कि लोग परिवारवादी राजनीति से तंग आ चुके हैं। आज वे वंशवाद नहीं, विश्वासवाद चुन रहे हैं। pic.twitter.com/rZvWfq9HWu
वर्क फ्रॉम होमला पुन्हा यंत्रणेत आणण्याची आवश्यकता
वर्क फ्रॉम होम संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी यादरम्यान व्यक्त केली. घरातून काम केल्यास वाहतूक खर्च, इंधन वापर आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.(PM Narendra Modi Economic Appeals)
परकीय चलन वाचवण्यावर भर देणे
परकीय चलनाची बचत आणि देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी विदेशी उत्पादनांची खरेदी कमी करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. ‘स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या’ हा संदेश त्यांनी पुन्हा अधोरेखित केला.(PM Narendra Modi Economic Appeals)
After programmes in Bengaluru and Hyderabad, landed in Jamnagar a short while ago. Upon landing, addressed a public meeting in the city. Thanked the people of Gujarat for their continuous blessings for the BJP. It is rare for a party to get so much support over decades and as… pic.twitter.com/hpSOUlllfR
पंतप्रधानांच्या या सूचनांकडे केवळ आर्थिक सल्ला म्हणून नव्हे, तर देशाच्या दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.(PM Narendra Modi Economic Appeals)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.